एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने 500 शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप
एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने 500 शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप
श्रीमद रामचंद्र मिशन धरमपूर आणि एकता सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक साहित्य किट वाटप कार्यक्रम गुलटेकडी पुणे येथील शाहीशहनाई हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते सुमारे 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेविका सिद्धी शिळीमकर, संजय बोरा, अजित खाडीलकर, माऊली काडगी, प्रसाद खंडागळे, किरण वैष्णव, गौतम बनसोडे, आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश थिटे, बालाजी शेरला, मुन्ना मुलानी, सचिन खंडागळे, उपेंद्र देशपांडे, राजेश आगरकर, सुहास सामल, शिवाजी साठे, मनोज चन्ना, विजय वाघचौरे, दीपक शिपकुले, आदींनी परिश्रम घेतले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व वारसा पुढे चालवत शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठू शकतो आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवनाचे रान करत यश संपादन करा. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परीक्षण जिद्द आणि ज्ञानाचा बळावर यश संपादन केले पाहिजे तसेच अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो असे मत पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी पर्वती विधानसभा उपाध्यक्ष गणेश शेरला यांनी केले.
Comments
Post a Comment