रॉक27 टी20 समर करंडक खुल्या क्रिकेट स्पर्धेत रॉक27 स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी, एसएस बिझनेस ग्रुप संघांचा दुसरा विजय
रॉक27 टी20 समर करंडक खुल्या क्रिकेट स्पर्धेत रॉक27 स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी, एसएस बिझनेस ग्रुप संघांचा दुसरा विजय
पुणे, 2जून 2026: रॉक27 स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित रॉक27 टी20 समर करंडक खुल्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत रॉक27 स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी, एसएस बिझनेस ग्रुप या संघांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
वडकी येथील रॉक27 स्पोर्ट्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अमेय ठोकळ(82धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर व्हर्टेक्स क्रिकेट अकादमी संघाने इन्स्पायर क्रिकेट अकादमी संघावर 61 धावांनी विजय मिळवला.
दुसऱ्या लढतीत अथर्व आखाडे(4-29) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रॉक 27 क्रिकेट अकादमी संघाने अभयदादा जगताप इलेव्हन संघाचा 7 गडी राखून पराभव केला. अन्य लढतीत महेश शिंदे(24 धावा व 1-24) याने केलेल्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर एसएस बिझनेस ग्रुप संघाने स्ट्रायकर इलेव्हन संघाचा 63 धावांनी पराभव केला.
निकाल: साखळी फेरी:
व्हर्टेक्स क्रिकेट अकादमी: 20षटकात 4बाद 178धावा(अमेय ठोकळ 82(41,7×4,6×6), स्वप्नील पवार 50(46,5×4), विवेक अनाची 21, आराध्य खंबे 2-34) वि.वि.इन्स्पायर क्रिकेट अकादमी: 20षटकात 4बाद 117धावा(अद्वैत नवले नाबाद 57(46,7×4,2×6), हिमांशु जैस्वार नाबाद 20, पार्थ पठारे 2-22); सामनावीर -अमेय ठोकळ; व्हर्टेक्स क्रिकेट अकादमी 61 धावांनी विजयी;
अभयदादा जगताप इलेव्हन: 18.2षटकात सर्वबाद 141धावा(आदित्य गुर्जर 41(29,5×4,1×6), व्यंकटेश यादव 26, वेद राणा 22, अथर्व आखाडे 4-29, समर्थ भोसले 2-17, दीप वाबळे 2-20, श्लोक नवगिरे 2-26) पराभूत वि.रॉक 27 क्रिकेट अकादमी: 18.5षटकात 3बाद 145धावा(आर्यन काळे 69(55,8×4,3×6), आर गायकवाड 42(41,5×4,1×6), वेद राणा 1-18); सामनावीर - अथर्व आखाडे; रॉक 27 क्रिकेट अकादमी7 गडी राखून विजयी;
एसएस बिझनेस ग्रुप: 20षटकात 8बाद 159धावा(सुरज शिंदे 35, वेदांत लोंढे 25, महेश शिंदे 24, अनिकेत कुंभार 23, ईशान गोवे 3-34, आकाश पांडेकर 1-25) वि.वि.स्ट्रायकर इलेव्हन: 16.5षटकात सर्वबाद 96धावा(यश कुंटे 30, ईशान गोवे 16, कपिल जांजिड 17, प्रणव थोंगे 14, नील गांधी 2-6, महेश शिंदे 1-24); सामनावीर - महेश शिंदे; एसएस बिझनेस ग्रुप 63 धावांनी विजयी.
Comments
Post a Comment