गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी २१ जून 2026 पूर्वी eShram वर नोंदणी करावी – भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे आवाहन



गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी २१ जून 2026 पूर्वी eShram वर नोंदणी करावी – भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे आवाहन

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने राज्यातील सर्व गिग व प्लॅटफॉर्म कामगारांना केंद्र सरकारच्या eShram पोर्टलवर तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने Swiggy, Zomato, Uber, Ola, Rapido, Blinkit, Zepto तसेच इतर डिजिटल प्लॅटफॉर्म कंपन्यांमध्ये कार्यरत गिग व प्लॅटफॉर्म कामगारांची eShram पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले असून, २१ जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत लाखो युवक डिलिव्हरी पार्टनर, कॅब चालक, बाईक टॅक्सी चालक आणि विविध प्लॅटफॉर्मद्वारे सेवा देणारे स्वतंत्र कामगार म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्यापैकी मोठ्या संख्येने कामगार सामाजिक सुरक्षा व्यवस्थेच्या कक्षेबाहेर आहेत. eShram नोंदणीमुळे या कामगारांचा अधिकृत डेटा तयार होऊन भविष्यातील सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, अपघाती विमा संरक्षण, शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ तसेच कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक धोरणे तयार करण्यास मदत होणार आहे.

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेश महामंत्री श्री. किरण मिलगीर यांनी सांगितले की, "ही नोंदणी केवळ औपचारिकता नसून गिग व प्लॅटफॉर्म कामगारांच्या सुरक्षित आणि सन्मानजनक भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र कामगाराने २१ जून 2026 पूर्वी स्वतःची नोंदणी पूर्ण करावी."

प्रदेश उपाध्यक्ष श्री. सचिन मेंगाळे यांनी राज्यातील सर्व कामगार संघटना, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, आपल्या परिसरातील प्रत्येक गिग व प्लॅटफॉर्म कामगारापर्यंत ही माहिती पोहोचवून जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करण्यात पुढाकार घ्यावा. सामाजिक सुरक्षेच्या कवचाखाली प्रत्येक कामगाराला आणण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने सर्व डिलिव्हरी पार्टनर्स, कॅब चालक, बाईक टॅक्सी चालक व इतर प्लॅटफॉर्म कामगारांना आवाहन केले आहे की, विलंब न करता eShram पोर्टलवर नोंदणी करून आपले हक्क आणि भविष्यातील सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करावी.

"संघटित व्हा – नोंदणी करा – हक्क मिळवा!"

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. श्रीपाद कुटासकर 
9422207010
सागर पवार 
9890169667
श्रीमती प्रणामीका बनसोडे 
9082696926 यांना संर्पक साधावा असे आवाहन केले आहे . 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश