पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकादमी (पीबीसीए), ट्रिनिटी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकादमी (पीबीसीए), ट्रिनिटी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे, दि.2 जून 2026: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पुनीत बालन क्रिकेट अकादमी (पीबीसीए), ट्रिनिटी या संघांनी अनुक्रमे विलास क्रिकेट क्लब व क्लब ऑफ महाराष्ट्र या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नेहरू स्टेडियम मैदानावरील लढतीत अमन सिंग(123 धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ट्रिनिटी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 72 धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना ट्रिनिटी संघाने 45 षटकात 7बाद 333धावा केल्या. यात अमन सिंगने आक्रमक फलंदाजी करताना 91चेंडूत 18चौकार व 2 षट्काराच्या मदतीने 123धावाची खेळी केली. त्याला आदित्य शिंदेने 62चेंडूत 5चौकार व 2षटकाराच्या मदतीने 54धावा काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७३ चेंडूत ८१ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर संग्राम कांबळे 50, अद्विक तिवारी 32, प्रतिक कडलक 19, राजवीर देशमुख 12 यांनी धावा काढून संघाला 333 धावांचा टप्पा गाठून दिला.
या आव्हानाचा पाठलाग करताना क्लब ऑफ महाराष्ट्र संघ 38.5 षटकात सर्वबाद 261 धावावर संपुष्टात आला. यात कार्तिक जगतापने 82चेंडूत 10चौकार व 1 षट्काराच्या साहाय्याने 103 धावांची शतकी खेळी केली. त्याला हर्षवर्धन नरवटेने 74चेंडूत 9चौकारांसह 76 धावा काढून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १२५ चेंडूत १४३ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. हे दोघेही एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर मधली फळी सपशेल अपयशी ठरली. ट्रिनिटी संघाकडून अद्वैत डेरे(3-58), अद्विक तिवारी(3-44), प्रतीक कडलक (2-57) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 72 धावांनी विजय मिळवून दिला.
ब्रिलियंट्स मैदानावरील लढतीत आयुश रक्ताडे(106 धावा व 4-6) याने केलेल्या सुरेख अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुनीत बालन क्रिकेट अकादमी (पीबीसीए) संघाने विलास क्रिकेट क्लब संघावर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
नेहरू स्टेडियम क्रिकेट मैदान:
ट्रिनिटी: 45 षटकात 7बाद 333धावा(अमन सिंग 123(91,18x4,2x6), आदित्य शिंदे 54(62,5x4,2x6), संग्राम कांबळे 50(25,6x4,2x6), अद्विक तिवारी 32, प्रतिक कडलक 19, राजवीर देशमुख 12, हर्षल भांडाळकर 2-60, आधार सावंत 2-72) वि.वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 38.5 षटकात सर्वबाद 261 धावा(कार्तिक जगताप 103(82,10x4,1x6), हर्षवर्धन नरवटे 76(74,9x4), आराध्य सिंग 27, सुमित कोकरे 22, प्रद्युम्न धोंड 14, अद्वैत डेरे 3-58, अद्विक तिवारी 3-44, प्रतीक कडलक 2-57); सामनावीर -अमन सिंग; ट्रिनिटी 72 धावांनी विजयी;
ब्रिलियंट्स मैदान:
पुनीत बालन क्रिकेट अकादमी (पीबीसीए): 45 षटकात 8बाद 302धावा(आयुश रक्ताडे 106(51,9x4,9x6), कौशिक सुर्यवंशी 63(81,7x4,1x6), वेद व्हीएस 59(76,4X4,3X6), ओम भामरे 26, अनिश जोशी 21,साईराज शेलार 3-54, मुकुंद बाबर 2-37) वि.वि.विलास क्रिकेट क्लब: 23.5 षटकात सर्वबाद 99धावा(वेंकटेश हरकुडे 25, सार्थक ढमढेरे 17, मेधांश जाधव 15, आयुश रक्ताडे 4-6, सार्थक छबिलवाड 3-23); सामनावीर-आयुश रक्ताडे; पीबीसीए 203 धावांनी विजयी.
Comments
Post a Comment