एकम चषक दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शारंग गवळी याला दुहेरी मुकुट 15 वर्षांखालील मुलींच्या गटात दिया शिंदे हिला विजेतेपद
एकम चषक दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शारंग गवळी याला दुहेरी मुकुट
15 वर्षांखालील मुलींच्या गटात दिया शिंदे हिला विजेतेपद
पुणे, 10 जून 2026: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या एकम चषक दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलांच्या गटात शारंग गवळी याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
एक्झाम ग्रॅव्हिटी सभागृह, पिंपरी चिंचवड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित शारंग गवळी याने अव्वल मानांकित आर्यन वानखडेचा 11-6,11-7,8-11,11-9 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. शारंग हा विद्या व्हॅली शाळेत नववी इयत्तेत शिकत असून पीवायसी टॉस अकादमी येथे प्रशिक्षक दिपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर मुलींच्या गटात अंतिम सामन्यात दिया शिंदे हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सातव्या मानांकित शरण्या पटवर्धनचा 14-12,11-7,11-9 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दिया हि न्यू इंग्लिश शाळेत नववी इयत्तेत शिकत असून पीवायसी टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दिपेश अभ्यंकर व मकरंद साने यांच्या मार्गदर्शनखाली सराव करते.
दुहेरीत 15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित शारंग गवळी व आर्यन वानखडे या जोडीने अव्वल मानांकित एल्विस टॉम व धैर्य शहा यांचा 11-3,11-5,11-8 असा पराभव करुन विजेतेपदाला गवसणी घातली.
19 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित मेधा कोत्राने चौथ्या मानांकित निधी भांडारकरचा 7-11,14-16,11-7,11-7,11-8 असा संघर्षपूर्ण पराभव केला. श्रेया गायकवाड हिने दुसऱ्या मानांकित मृदुला सुरवसेवर 3-11,11-5,11-9,7-11,11-2 असा सनसनाटी विजय मिळवला. प्रौढ एकेरी( 60 वर्षांवरील) गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित बापू काटधरे याने अव्वल मानांकित रोहिंटन तोडीवालाचा 10-12,11-7,11-8,8-11,11-4 असा तर, नंदकुमार जगतापने तिसऱ्या मानांकित श्रीशैला आरएसचा 11-4,11-7,11-8 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.
17 वर्षांखालील मुलींच्या गटात पाचव्या मानांकित दिया शिंदेने चौथ्या मानांकित नीरजा देशमुखला 11-4,11-13,11-8,11-7 असे पराभूत केले. तर, सहाव्या मानांकीत श्रेया कोठारीने तिसऱ्या मानांकित मृदुला सुरवसेचा 6-11,13-11,12-10,11-8 असा तर, सातव्या मानांकित मेधा कोत्राने दुसऱ्या मानांकित श्रेया गायकवाडचा 7-11,11-8,12-10,4-11,11-9 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
निकाल: 15 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
आर्यन वानखडे[1] वि.वि.वरद माळवदकर 11-8,11-9,10-12,11-8
धैर्य शहा[4] वि.वि.एल्विस टॉम[5] 11-8,11-5,11-5
शारंग गवळी[3] वि.वि. नभ पांचोलिया [6] 11-2,9-11,11-7,11-8
नक्ष महाजन वि.वि. निरव मुळ्ये[2] 11-7,11-1,11-9;
उपांत्य फेरी:
आर्यन वानखडे[1] वि.वि.धैर्य शहा[4] 11-7,6-11,11-7,11-9
शारंग गवळी[3]वि.वि.नक्ष महाजन 11-6,11-6,10-12,11-4
अंतिम फेरी: शारंग गवळी[3]वि.वि.आर्यन वानखडे[1] 11-6,11-7,8-11,11-9
15 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
दिया शिंदे[1] वि.वि.नीरजा देशमुख[5]12-10,11-5,11-6
शरण्या पटवर्धन [7] वि.वि.एरिना अहमद 16-14,11-5,11-8
अंतिम फेरी: दिया शिंदे[1] वि.वि.शरण्या पटवर्धन [7] 14-12,11-7,11-9
19 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
जान्हवी फणसे[1] वि.वि. श्रेया कोठारी 11-9,11-4,11-5
मेधा कोत्रा वि.वि.निधी भांडारकर[4] 7-11,14-16,11-7,11-7,11-8
आद्या गवात्रे[3] वि.वि. नीरजा देशमुख 11-13,5-11,11-6,11-5,11-4
श्रेया गायकवाड वि.वि.मृदुला सुरवसे[2] 3-11,11-5,11-9,7-11,11-2
प्रौढ एकेरी( 60 वर्षांवरील): उपांत्यपूर्व फेरी:
बापू काटधरे वि.वि.रोहिंटन तोडीवाला[1] 10-12,11-7,11-8,8-11,11-4
रसिक शेटिया [4] वि.वि. किरण सोनवणे 11-8,13-11,11-4
नंदकुमार जगताप वि.वि. श्रीशैला आरएस[3] 11-4,11-7,11-8
17 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
आद्या गवात्रे[1] वि.वि.सारा गांधी[8] 11-8,11-7,11-6
दिया शिंदे[5] वि.वि. नीरजा देशमुख[4] 11-4,11-13,11-8,11-7
श्रेया कोठारी[6] वि.वि. मृदुला सुरवसे[3] 6-11,13-11,12-10,11-8
मेधा कोत्रा[7] वि.विश्रेया गायकवाड[2] 7-11,11-8,12-10,4-11,11-9
दुहेरी: 15 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
एल्विस टॉम / धैर्य शहा[1]वि.वि.नभ पांचोलिया / निरज नांदेडे [4] 10-12,11-8,11-8,8-11,11-6
शारंग गवळी / आर्यन वानखडे [3]वि.वि.नक्ष महाजन / वरदान कोलते[2] 11-4,11-9,11-7
अंतिम फेरी: शारंग गवळी/आर्यन वानखडे[3]वि.वि.एल्विस टॉम/धैर्य शहा[1] 11-3,11-5,11-8
Comments
Post a Comment