एमएसएलटीए - नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(14वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत सान्वी गोसावी, हृदवी लिमकर, माया रस्किन्हा यांची धडाकेबाज सलामी



एमएसएलटीए - नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(14वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत सान्वी गोसावी, हृदवी लिमकर, माया रस्किन्हा यांची धडाकेबाज सलामी 

पुणे,दि.१ जून २०२६: ऐम टेनिस अकादमी यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन्स पुणे यांच्या सहकार्याने आयोजित एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए - नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात सान्वी गोसावी, हृदवी लिमकर, माया रस्किन्हा यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला. 

नवसह्याद्री क्रीडा संकूल व आरजी टेनिस अकादमी टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या फेरीत बिगर मानांकित सान्वी गोसावीने तिसऱ्या मानांकित वाण्या अगरवालचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. क्वालिफायर हृदवी लिमकर हिने चौथ्या मानांकित यायरा सॅमसनचा ६-१, ६-२ असा सहज पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. माया रस्किन्हा हिने आठव्या मानांकित आलिया रहीमचा कडवा संघर्ष ७-५, ४-६, ६-१ असा मोडीत काढला. अव्वल मानांकित जान्हवी सावंत हिने इशिता पाटीलचा ६-०, ६-४ असा तर, ख़ुशी नागपुरेने आभा जोशीचा ६-२, ४-६, ६-४ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. 

याआधी स्पर्धेचे उद्घाटन ॲड. जितेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवसह्याद्री सोसायटीचे क्रीडा समितीचे अध्यक्ष जयंत लाड, क्रीडा समिती सदस्य हेमंत भावे, नितीन देवळीकर, उमेश भिडे, स्पर्धा संचालक केतन धुमाळ, एआयटीए सुपरवायझर प्रवीण झिटे, अव्यक्ता व अनया थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: पहिली फेरी: मुली:
जान्हवी सावंत(१)वि.वि.इशिता पाटील ६-०, ६-४;
ख़ुशी नागपुरे वि.वि.आभा जोशी ६-२, ४-६, ६-४;
नविता येवले वि.वि.निओजिता सिंग ६-४, ६-३;
ख्याती मनीष(८)वि.वि.वल्लभा शिंदे ६-१, ६-४;
सान्वी गोसावी वि.वि.वाण्या अगरवाल(३)६-२, ६-३;
थिया देसाई वि.वि.ईशना नायडू ६-१, ६-३;
श्रीनिधी कुलकर्णी वि.वि.मेघ मेघा गायकवाड ६-४, ३-६, ७-५;
माया रस्किन्हा वि.वि.आलिया रहीम(८)७-५, ४-६, ६-१;
कायरा मानकर(५)वि.वि.त्रिशा राजपूत ६-२, ६-१;
हृदवी लिमकर वि.वि.यायरा सॅमसन(४)६-१, ६-२;
अन्वी चिटणीस(७)वि.वि.द्विजा जणी ६-०, ६-०;
गार्गी ओक वि.वि.रिशीता भातखंडे ६-१, ६-२;
नावीन्या सानप वि.वि.काव्या हळदुळे ६-४, ६-४;
स्वरा पवार(२)वि.वि.वैणवी रावत ६-२, ६-२. 


 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश