एमएसएलटीए - नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(14वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत पलाश जैनचा मानांकित खेळाडूवर विजय


एमएसएलटीए - नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(14वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत पलाश जैनचा मानांकित खेळाडूवर विजय 

पुणे,दि.२ जून २०२६: ऐम टेनिस अकादमी यांच्या तर्फे व पीएमडीटीए व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन्स पुणे यांच्या सहकार्याने आयोजित एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए - नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पलाश जैन याने दुसऱ्या मानांकित लव परदेशीचा ६-१, १-६, ६-१ असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.

नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित आवीर घुमरेने क्रिशांग शर्माचा ६-१, ६-१ असा सहज पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. चुरशीच्या लढतीत अगस्त्य तापकीरने रिषभ अनुपचा कडवा प्रतिकार ७-६(३), २-६, ७-५ असा संपुष्टात आणला. अद्वैत गुंड हिने बलराज बिराजदारचा टायब्रेकमध्ये ७-६(६), ६-३ असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित अक्ष बोरा याने अरिंजय बांगचा ६-४, ६-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 

मुलींच्या गटात अव्वल मानांकित जान्हवी सावंत हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत ख़ुशी नागपुरेचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. आठव्या मानांकित ख्याती मनीष हिने नविता येवलेवर ६-१, ६-० असा विजय मिळवला. 

निकाल: दुसरी फेरी: मुली:
जान्हवी सावंत(१)वि.वि.ख़ुशी नागपुरे ६-०, ६-०;
ख्याती मनीष(८)वि.वि.नविता येवले ६-१, ६-०;
थिया देसाई वि.वि. सान्वी गोसावी ६-२, ६-४;
माया रस्किन्हा वि.वि.श्रीनिधी कुलकर्णी ६-१, ६-४;
कायरा मानकर(५)वि.वि.आर्या कुलकर्णी ६-२, ६-१; 
भाव्या सोनकर वि.वि.हृदवी लिमकर ७-५, ६-३;
अन्वी चिटणीस(७)वि.वि.गार्गी ओक ६-२, ६-१; 
स्वरा पवार(२)वि.वि. नावीन्या सानप ६-२, ६-२. 

मुले:
आवीर घुमरे(१)वि.वि.क्रिशांग शर्मा ६-१, ६-१;
अद्वैत गुंड वि.वि.बलराज बिराजदार ७-६(६), ६-३;
आर्यन बॅनर्जी वि.वि.अर्णव भट्टभट्ट ६-२, ६-२;
अगस्त्य तापकीर वि.वि.रिषभ अनुप ७-६(३), २-६, ७-५;
हर्ष नागवानी(५)वि.वि.विवान डिक्कर ६-०, ६-१; 
अक्ष बोरा(३)वि.वि.अरिंजय बांग ६-४, ६-१;
रेयांश गुंड वि.वि.वेद परदेशी ६-३, ६-३;
पलाश जैन वि.वि.लव परदेशी(२)६-१, १-६, ६-१.  


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश