तोशिबाने 'पॉवरग्रिड'ला 132 किलोवोल्ट सिस्टीम सुपूर्द करून केला आपल्या स्वदेशी एम-जीआयएस पोर्टफोलिओचा विस्तार
तोशिबाने 'पॉवरग्रिड'ला 132 किलोवोल्ट सिस्टीम सुपूर्द करून केला आपल्या स्वदेशी एम-जीआयएस पोर्टफोलिओचा विस्तार
हैदराबाद, 1 जून 2026 - भारताच्या पहिल्या 220 केव्ही एम-जीआयएस सिस्टीमच्या सादरीकरणानंतर आपल्या स्वदेशी एम-जीआयएस पोर्टफोलिओचा आणखी विस्तार करत, तोशिबा ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (टीटीडीआय) ने आज पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पॉवरग्रिड) कडे स्वदेशी विकसित 132 केव्ही एम-जीआयएस सिस्टीम यशस्वीपणे सुपूर्द केल्याची घोषणा केली.
132 केव्ही एम-जीआयएस सिस्टीमचा विकास आणि त्याची सुपूर्दता हा भारतातील स्वदेशी मोबाईल हाय-व्होल्टेज सोल्यूशन्स पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या टीटीडीआयच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. उपकरणांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी पॉवरग्रिडला पुरवण्यात आलेली ही प्रणाली, ग्रीड आधुनिकीकरण, लवचिकता आणि स्वदेशीकरणाच्या दिशेने भारताच्या सुरू असलेल्या प्रवासाला देखील बळ देते.
या महत्त्वाच्या टप्प्यावर, टीटीडीआयचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री. हिरोशी फुरुता म्हणाले, “पॉवरग्रिडला स्वदेशी 132 केव्ही एम-जीआयएस सिस्टीम सुपूर्द करून आमच्या एम-जीआयएस पोर्टफोलिओचा आणखी विस्तार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वीच भारताच्या पहिल्या स्वदेशी 220 केव्ही एम-जीआयएस सिस्टीमच्या यशस्वी सुपूर्ततेनंतर लगेचच हा टप्पा गाठला गेला आहे. हे कॉम्पॅक्ट आणि अत्यंत सहज कोठेही नेण्याजोगी ही प्रणाली भारतातच विकसित आणि बनवली गेली आहे, जे सरकारच्या 'मेक इन इंडिया' मिशनप्रती आमची असलेली दृढ वचनबद्धता दर्शवते. ही प्रणाली तोशिबाचे तंत्रज्ञान आणि स्थानिक इंजिनिअरिंग क्षमतेचा प्रभावी वापर करून पॉवरग्रिडच्या अवघड तांत्रिक आणि कार्यात्मक गरजा पूर्ण करते. भारताचे (पारेषण) ट्रान्समिशन क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना, टीटीडीआय ग्रीडची उपलब्धता आणि लवचिकता वाढवणारे अशाच प्रकारचे गरजेनुसार तयार केलेले आणि उच्च- कार्यक्षम उपाय देत राहील.”
पॉवरग्रिडच्या उत्पादनाचे तपशील आणि तांत्रिक, गुणवत्ता, कार्यात्मक व सुरक्षा विषयक गरजांचा अंतर्भाव करून, टीटीडीआयने तोशिबाचे इंजिनिअरिंग कौशल्य, तंत्रज्ञान आणि भारतातील स्थानिक उत्पादन क्षमतेचा प्रभावी वापर करत 132 केव्ही एम-जीआयएस प्रणाली विकसित केली आहे.
आव्हानात्मक परिस्थितीमध्येही अत्यंत विश्वासार्हतेने काम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या 132 केव्ही एम-जीआयएस प्रणालीमध्ये एक प्रमाणित “कनेक्ट–ऑपरेट–डिस्कनेक्ट–रिडिप्लॉय” (जोडा–वापरा–तोडा–पुन्हा जोडा) अशी संरचना आहे, जी संपूर्ण ग्रीडमधील गतिशीलता आणि कार्यात्मक लवचिकता लक्षणीयरीत्या वाढवते.
आपल्या आकाराने लहान आणि मॉड्युलर रचनेमुळे, ही सिस्टीम दाट गर्दीच्या ठिकाणी आणि विस्तारत जाणाऱ्या पारेषण परिसंस्थेमध्ये वेगाने वहन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही सिस्टीम प्रमाणित ट्रान्सपोर्ट ट्रेलर्सवर सहज बसेल, यांत्रिक कंपन आणि वाहतुकीचा ताण सहन करेल, महत्त्वपूर्ण इलेक्ट्रिकल क्लिअरन्स राखेल आणि थेट सुरू असलेल्या प्रोजेक्ट साईट्सवर अखंडपणे जोडली जाईल अशा पद्धतीने बनवण्यात आली आहे.
यामुळेच ही 132 केव्ही एम-जीआयएस प्रणाली जलद गतीने काम करणाऱ्या मोबाईल पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असलेल्या उपयुक्तता सेवा, अपारंपरिक ऊर्जा विकासक, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि पारेषण ऑपरेटर यांच्यासाठी अत्यंत विश्वासार्ह साधन ठरते.
भारताच्या पहिल्या 220 केव्ही एम-जीआयएस प्रणालीच्या आणि आता पॉवरग्रिडला 132 केव्ही मॉडेलच्या यशस्वी सुपूर्ततेनंतर, टीटीडीआय सध्या आपल्या स्वदेशी 400 केव्ही एम-जीआयएस प्रणालीच्या इंजिनिअरिंगच्या प्रगत टप्प्यात असून, या वर्षाच्या उत्तरार्धात तिची सुपूर्तता केली जाणार आहे.
Comments
Post a Comment