पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शरण्या पटवर्धन हिला दुहेरी मुकुट11 वर्षाखालील मुलांच्या गटात स्वयम कोठावळेला विजेतेपदपुरुष दुहेरीत भार्गव चक्रदेव व शौरेन सोमण यांना विजेतेपद



पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शरण्या पटवर्धन हिला दुहेरी मुकुट

11 वर्षाखालील मुलांच्या गटात स्वयम कोठावळेला विजेतेपद
पुरुष दुहेरीत भार्गव चक्रदेव व शौरेन सोमण यांना विजेतेपद 

 पुणे, 1 जून 2026: शारदा स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शरण्या पटवर्धन हिने 11 व 13 वर्षाखालील या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर 11 वर्षाखालील मुलांच्या गटात स्वयम कोठावळेयाने, पुरुष दुहेरीत भार्गव चक्रदेव व शौरेन सोमण यांनी विजेतेपद पटकावले.

शारदा स्पोर्ट्स सेंटर येथील टेबल टेनिस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम लढतीत शरण्या पटवर्धन हिने शगुन गणेशीचा 8-11,11-7,11-5,14-12 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. शरण्या ही बाल शिक्षण शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून एमडब्ल्यूटीटीए येथे सराव करते. 

11 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित स्वयम कोठावळे याने अव्वल मानांकित नक्ष महाजनचा 12-10,6-11,11-9,7-11,11-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्वयम हा अभिनव इंग्रजी शाळेत पाचवी इयत्तेत शिकत आहे. 

पुरुष दुहेरीत अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित भार्गव चक्रदेव व शौरेन सोमण या जोडीने जय पेंडसे व ईशान खांडेकर यांचा 11-8,12-10,9-11,10-12,11-7 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, पीडीटीटीएचे उपाध्यक्ष उदय भालचंद्र, उपाध्यक्षा स्मिता बोडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीटीटीएचे निवड समितीचे चेअरमन मोहन उसगांवकर, श्रीकांत अंतुरकर, अरविंद नातू, सुरेंद्र देशपांडे, अविनाश जोशी, स्पर्धा संयोजन सचिव आशिष बोडस आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: 11 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
नक्ष महाजन[1] वि.वि.अर्श खोजा 11-1,11-1,11-0;
देबियन बॅनर्जी[4] वि.वि.अवधूत डोले 9-11,13-11,11-7,11-6;
आरव बापट[3] वि.वि.नमन अगरवाल 11-6,11-5,10-12,10-12,11-5;
स्वयम कोठावळे [2] वि.वि.समर्थ कदम 11-9,11-4,11-6;
उपांत्य फेरी: 
नक्ष महाजन[1] वि.वि.देबियन बॅनर्जी[4] 11-3,11-3,8-11,11-6;
स्वयम कोठावळे [2] वि.वि.आरव बापट[3]11-7,11-7,11-6;
अंतिम फेरी: स्वयम कोठावळे [2] वि.वि.नक्ष महाजन[1] 12-10,6-11,11-9,7-11,11-6;

11 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
शरण्या पटवर्धन[1] वि.वि.स्वधा व्यास 11-3,11-3,11-2;
नेत्रा होनप[4] वि.वि. अनन्या साठे 11-7,11-3,5-11,13-15,11-7;
रूही भारद्वाज वि.वि.मिहिका पांडकर 11-5,11-9,11-8;
शगुन गणेशी वि.वि.अनन्या जोशी 11-2,11-1,11-0;
उपांत्य फेरी: 
शरण्या पटवर्धन[1] वि.वि.नेत्रा होनप[4] 11-3,9-11,11-2,11-4;
शगुन गणेशी वि.वि.रूही भारद्वाज 11-2,11-5,11-1;
अंतिम फेरी: शरण्या पटवर्धन[1] वि.वि.शगुन गणेशी 8-11,11-7,11-5,14-12;

पुरुष दुहेरी: उपांत्य फेरी:
जय पेंडसे/ईशान खांडेकर वि.वि.शुभंकर रानडे/रोहित देसाई [1] 11-8,10-12,12-10,11-9;
भार्गव चक्रदेव/शौरेन सोमण [2] वि.वि.उपेंद्र मुळ्ये/नीरव मुळ्ये [3] 11-8,11-9,11-6;
अंतिम फेरी: भार्गव चक्रदेव/शौरेन सोमण [2] वि.वि.जय पेंडसे/ईशान खांडेकर 11-8,12-10,9-11,10-12,11-7.



 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश