योनेक्स सनराईज जीएच रायसोनी मेमोरियल डिस्ट्रिक्ट सुपर 1000 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कायरा रैना, विहान कोल्हाडे, शरयू रांजणे, सोयरा शेलार, अभिक शर्मा, स्वरीत सातपुते यांना दुहेरी मुकुट



योनेक्स सनराईज जीएच रायसोनी मेमोरियल डिस्ट्रिक्ट सुपर 1000 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कायरा रैना, विहान कोल्हाडे, शरयू रांजणे, सोयरा शेलार,  अभिक शर्मा, स्वरीत सातपुते यांना दुहेरी मुकुट       

पुणे, 23 जून 2026: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना यांच्या वतीने व पीएनजीएस गार्गी, अमनोरा यांच्या सहकार्याने आयोजित योनेक्स सनराईज जीएच रायसोनी मेमोरियल डिस्ट्रिक्ट सुपर 1000 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत  कायरा रैना, विहान कोल्हाडे, शरयू रांजणे, सोयरा शेलार,  अभिक शर्मा, स्वरीत सातपुते यांनी दुहेरी मुकुट संपादन केला. 

पीइ सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 15 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित कायरा रैना हिने तिसऱ्या मानांकित ख्याती कत्रेचा 15-07, 15-10 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. कायरा हि वास्त्यल्य शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून सीबीइ अकादमीत प्रशिक्षक सागर चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.  याच मुलांच्या गटात अंतिम लढतीत अकराव्या मानांकित विहान कोल्हाडेने तिसऱ्या मानांकित हृदान पाडवेचा 09-15, 15-07, 15-12 असा कडवा प्रतिकार करत विजेतेपद पटकावले.  विहान हा संचेती शाळेत नववी इयत्तेत शिकत असून एनकेबीए अकादमीत प्रशिक्षक मयंक गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित एल. अभिग्यान सिंघा याने कपिल जगदाळेचा 08-15, 15-08, 15-08 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.  अभिग्यान हा बिशप्स शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून एवाय अकादमीत प्रशिक्षक आकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलींच्या गटात कायरा रैना हिने अव्वल मानांकित समन्वया धनंजयचा 15-08, 12-15, 15-13 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

 19 वर्षाखालील मुलांच्या गटात आठव्या मानांकित निक्षेप कत्रेने सातव्या मानांकित सार्थक पाटणकरचा 15-08, 15-03 असा तर, मुलींच्या गटात बिगर मानांकित युतिका चव्हाणने पाचव्या मानांकित नव्या रांकाचा 15-13, 15-12 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरुष गटात दहाव्या मानांकित ऋषभ देशपांडेने चौथ्या मानांकित अवधूत कदमचा 15-06, 15-09 असा तर, महिला गटात सहाव्या मानांकित  साद धर्माधिकारी हिने श्रेया भोसलेचा 15-09, 15-16 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 

दुहेरीत 15 वर्षांवरील मुलांच्या गटात हृदान पाडवे व विहान कोल्हाडे या तिसऱ्या मानांकित जोडीने जतिन सराफ व खुश दिक्षित यांचा 15-09, 15-05 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात अभिक शर्माने स्वरीत सातपुतेच्या साथीत अवनीश बांगर व आयांश यारागट्टी यांचा 15-06, 15-06 असा तर, मुलींच्या गटात  शरयू रांजणे व सोयरा शेलार यांनी दुसऱ्या मानांकित ख्याती कत्रे व शर्वरी सुरवसे यांचा 15-13, 15-07 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 19 वर्षाखालील मुलांच्या गटात अभिक शर्मा व स्वरीत सातपुते या तिसऱ्या मानांकित जोडीने अवधूत कदम व ओजस जोशी यांचा  18-20, 15-13, 15-13 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. याच मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित शरयू रांजणे व सोयरा शेलार यांनी चौथ्या मानांकित नव्या रांका व श्रेया चौधरी यांचा  15-05, 15-05 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जीएच रायसोनी स्किल टेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रवींद्र खराडकर, पीडीएमबीएचे उपाध्यक्ष शशांक हळबे, खजिनदार सारंग लागू, सह सचिव आनंद जोशी, यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, नीलकंठ कुलकर्णी, प्रसाद परळीकर, अनिरुद्ध जोशी, अंजली लागू आदी मान्यवर उपस्थित होते.
 
निकाल: अंतिम फेरी: 
15 वर्षाखालील मुले: विहान कोल्हाडे[11] वि.वि. हृदान पाडवे[3] 09-15, 15-07, 15-12; 
15 वर्षाखालील मुली: कायरा रैना वि.वि.ख्याती कात्रे[3] 15-07, 15-10; 

17 वर्षांखालील मुले:  एल.  अभिग्यान सिंघा[1] वि.वि.कपिल जगदाळे 08-15, 15-08, 15-08; 
17  वर्षांखालील मुली:  कायरा रैना वि.वि.समन्वया धनंजय[1] 15-08, 12-15, 15-13; 

19 वर्षाखालील मुले: निक्षेप कत्रे[8]वि.वि.सार्थक पाटणकर[7] 15-08, 15-03;
19 वर्षाखालील मुली: युतिका चव्हाण वि.वि.नव्या रांका[5] 15-13, 15-12; 

पुरुष गट: ऋषभ देशपांडे [10]वि.वि.अवधूत कदम[4] 15-06, 15-09;
महिला गट: साद धर्माधिकारी[6]वि.वि.श्रेया भोसले 15-09, 15-16;

दुहेरी: 15 वर्षांवरील मिश्र गट: खुश दिक्षित/द्रुवी कुंभेफाळकर[4]वि.वि.जयेश खेमणार/आरोही जाधव[3]15-06, 15-07;
15 वर्षांवरील मुले: हृदान पाडवे/विहान कोल्हाडे[3] वि.वि.जतिन सराफ/खुश दिक्षित 15-09, 15-05;
15 वर्षांवरील मुली: आराध्या ढेरे/रावी मेहेत्रे वि.वि.आध्या शिंदे/शर्वरी वरवंटकर[4] 18-16, 15-08;

17 वर्षाखालील मिश्र दुहेरी: राघवेंद्र यादव/शर्वरी सुरवसे[3] वि.वि.रेयश चौधरी/तेजस्वी भुतडा 15-07, 15-11;
17 वर्षाखालील मुले: अभिक शर्मा/स्वरीत सातपुते वि.वि.अवनीश बांगर/आयांश यारागट्टी[2]15-06, 15-06;
17 वर्षाखालील मुली: शरयू रांजणे/सोयरा शेलार वि.वि.ख्याती कत्रे/शर्वरी सुरवसे[2] 15-13, 15-07;

19 वर्षाखालील मिश्र दुहेरी: सलील मणेरी/साफा शेख[4]वि.वि.निक्षेप कत्रे/ख्याती कत्रे 15-12, 10-15, 15-08;
19 वर्षाखालील मुले: अभिक शर्मा/स्वरीत सातपुते[3]वि.वि.अवधूत कदम/ओजस जोशी[4] 18-20, 15-13, 15-13;
19 वर्षाखालील मुली: शरयू रांजणे/सोयरा शेलार[3] वि.वि.नव्या रांका/श्रेया चौधरी[4] 15-05, 15-05;

पुरुष दुहेरी: अवधूत कदम/ओजस जोशी वि.वि.हकीमोद्दीन अन्सारी/वसीम शेख 15-13, 15-12;
महिला दुहेरी: पूर्वा बर्वे/श्रुती मुंदडा[4] वि.वि.योगिता साळवे/युतिका चव्हाण[3] 15-11, 15-09;
मिश्र दुहेरी: विवेक चंद्रवंशी/अर्पिता आर्दे वि.वि.नरेंद्र पाटील/जुई जाधव 15-12, 15-11.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश