सॅमसंग आणि गुगलच्या नव्या इंटेलिजेंट आयवेअरचा फर्स्ट लूक
सॅमसंग आणि गुगलच्या नव्या इंटेलिजेंट आयवेअरचा फर्स्ट लूक
सोल, कोरिया - मे २०, २०२६ – सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि गुगलने आज गुगल आय/ओ २०२६ मध्ये आयवेअर भागीदार जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या सहयोगाने डिझाइन केलेल्या दोन प्रीमियम मॉडेल्सची पहिली झलक दाखवत नवीन इंटेलिजेंट आयवेअरचे अनावरण केले. मोबाइल फोनसाठी सहयोगी डिवाईस म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले हे नवीन आयवेअर वापरकर्त्यांना आवाजाच्या संवादाद्वारे मदत मिळवण्यास आणि त्यांच्या फोनशी विनासायासपणे जोडले जाण्यास सक्षम करते, जेथे ही सुविधा नेहमीच्या चष्म्याच्या रचनेत मिळते.
जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्कर यांच्या दोन प्रीमियम इंटेलिजेंट आयवेअर डिझाइन्स
आयवेअर भागीदारांसह सह-निर्मित केलेले हे इंटेलिजेंट आयवेअर क्रांतिकारी एआय क्षमतांना आराम आणि शैलीसोबत एकत्र आणते, ज्यामध्ये सॅमसंगचे हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील अग्रस्थान आणि गुगलचे एआय तंत्रज्ञान प्रीमियम आयवेअर डिझाइनशी जोडले गेले आहे. प्रत्येक आयवेअर ब्रँड या डिवाईसला वेगळा डिझाइन दृष्टिकोन देतो. फॅशन आयवेअरमधील आपल्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले जेंटल मॉन्स्टर हे नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैली सादर करते, तर वॉर्बी पार्कर परिष्कृत आणि चिरंतन डिझाइन्सचे प्रदर्शन करते.
वापरकर्त्यांच्या सोबतीने रिअल टाइममध्ये जगाला समजून घेण्यासाठी तयार केलेले हे नवीन इंटेलिजेंट आयवेअर वापरकर्त्यांचे हात मोकळे ठेवून आणि त्यांचे लक्ष समोर ठेवून दैनंदिन मदत पुरवते. वापरकर्ते फक्त आपल्या आवाजाद्वारे जेमिनीला विचारून नेव्हिगेशन मदत मिळवू शकतात, त्यांच्या चालण्याच्या मार्गावरील जवळचे कॉफी शॉप सारखे वैयक्तिकृत सल्ले मिळवू शकतात किंवा पिकअपसाठी ऑर्डर देखील देऊ शकतात. वापरकर्ते महत्त्वाच्या मेसेजच्या संक्षिप्त सूचना देखील मिळवू शकतात आणि त्यांच्या कॅलेंडरमध्ये कार्यक्रमाची भर करू शकतात. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये बोलणाऱ्याच्या आवाजाशी जुळणाऱ्या ऑडिओसह रिअल-टाइम भाषांतर, तसेच वापरकर्त्यांच्या नजरेत येणारे मेनू किंवा चिन्हांवरील मजकूराचे भाषांतर करण्याची क्षमता समाविष्ट आहे. गॅलेक्सी परिसंस्थेत विनासायासपणे काम करत हे डिवाईस वापरकर्त्यांना आपला फोन बाहेर न काढता दैनंदिन कामे सहजपणे व्यवस्थापित करण्यास किंवा अगदी सहजतेने फोटो काढण्यास मदत करते.
या दोन डिझाइन्स जेंटल मॉन्स्टरच्या नाविन्यपूर्ण तरीही सुबक शैलीचे आणि वॉर्बी पार्करच्या परिष्कृत व चिरंतन डिझाइन्सचे प्रतिबिंब आहेत.
"हे इंटेलिजेंट आयवेअर सॅमसंगच्या एआय दृष्टिकोनातील एक महत्त्वाचे पाऊल आहे," असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समधील मोबाइल एक्सपिरियन्स (एमएक्स) बिझनेसचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ कस्टमर एक्सपिरियन्स ऑफिस जे किम म्हणाजे. "या नवीन एआय फॉर्म फॅक्टरसह आम्ही गॅलेक्सी डिवाईस परिसंस्थेचा अधिक विस्तार करत आहोत, जिथे प्रत्येक डिवाईस त्याच्या रचनेला सर्वोत्तम सुधारेल असा अद्वितीय एआय अनुभव देण्यासाठी ऑप्टिमाइझ केले गेले आहे."
"इंटेलिजेंट आयवेअर हे एआयला दैनंदिन जीवनात अधिक उपयुक्त आणि सुलभ बनवण्याच्या सॅमसंगसोबतच्या आमच्या सामायिक दृष्टिकोनातील प्रबळ पाऊल आहे," असे गुगलमधील अँड्रॉइड एक्सआरचे व्हाईस प्रेसिडेंट आणि जीएम शाहराम इजादी म्हणाले. "गुगलचे सर्वोत्तम एआय आणि अँड्रॉइड परिसंस्था या दोघांना सॅमसंगचे मोबाइल हार्डवेअरमधील अग्रस्थान, तसेच जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्करच्या प्रीमियम डिझाइनशी जोडून आम्ही वापरकर्त्यांना अधिक नैसर्गिक आणि हँड्स-फ्री पद्धतीने कनेक्टेड व फॅशनेबल राहण्यास मदत करत आहोत."
"इंटेलिजेंट आयवेअर हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत असण्यासोबतच भावनिकदृष्ट्या व्यक्त होणारे देखील वाटले पाहिजे," असे जेंटल मॉन्स्टरचे संस्थापक आणि सीईओ हँकूक किम म्हणाले. "आमचा दृष्टिकोन फॅशन आणि तंत्रज्ञानाला अशा प्रकारे एकत्र आणण्याचा होता, जे धाडसी, सुंदर आणि मानवी वाटेल. सॅमसंग आणि गुगलच्या सोबतीने जेंटल मॉन्स्टरची नाविन्यपूर्ण डिझाइन ओळख इंटेलिजेंट आयवेअरच्या एका नवीन युगात घेऊन जाण्याचा आमचा हा प्रयत्न आहे."
"आयवेअर हे अत्यंत वैयक्तिक असते, म्हणून व्यक्ती दररोज वापरत असलेल्या फ्रेम्समध्ये प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट करताना प्रत्येक लहान तपशील महत्त्वाचा ठरतो," असे वॉर्बी पार्करचे सह-संस्थापक आणि को-सीईओ डेव्ह गिल्बोआ म्हणाले. "आमचे इंटेलिजेंट आयवेअर वापरण्यास अत्यंत सोपे वाटेल अशा पद्धतीने डिझाइन केले आहे, ज्यामध्ये वॉर्बी पार्करच्या सिग्नेचर डिझाइनला अचूक ऑप्टिक्स आणि अपवादात्मक आरामाची जोड दिली गेली आहे, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्यासमोरील क्षणांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल."
इंटेलिजेंट आयवेअरचे पहिले कलेक्शन या वर्षाच्या अखेरीस निवडक बाजारपेठांमध्ये लाँच करण्याचे नियोजित आहे, ज्याचा अतिरिक्त तपशील आगामी महिन्यांत घोषित केला जाईल.
Comments
Post a Comment