विश्वविक्रमी शिवछत्रपती' विषयावर विशेष व्याख्यान रविवारी (दि.३१)


'विश्वविक्रमी शिवछत्रपती' विषयावर विशेष व्याख्यान रविवारी (दि.३१)
इतिहास प्रेमी मंडळ आणि भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे आयोजन ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व युनेस्को करिता पाठविलेल्या निवेदनाचे विस्तृत विवेचन ऐकण्याची संधी

पुणे : इतिहास प्रेमी मंडळ आणि भारतीय इतिहास संकलन समितीच्या वतीने रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पेरूगेट भावे हायस्कूलचे सभागृह, सदाशिव पेठ, पुणे येथे 'दुर्ग दिन' निमित्त इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांचे 'विश्वविक्रमी शिवछत्रपती' या विषयावर स्लाईड शो व व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सांगली येथील प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि अभियंता असणारे प्रवीण भोसले यांनी मध्ययुगीन जगातील राजांनी केलेल्या दुर्ग बांधणी चा अभ्यास केला.आणि त्यांच्या हे लक्षात आले की जलदुर्ग स्थापत्यामधे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अतुलनीय आहे.इतकेच नाही तर शिवाजी महाराजांच्या नावावर एकदोन नाही तर चार विश्वविक्रम नोंदवले जाऊ शकतात. भोसले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील व शिवरायांच्या स्वराज्यातील जलदुर्गांचा तौलनिक अभ्यास केला.आपले अभ्यासपूर्ण निवेदन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व युनेस्को कडे पाठवले. हे विस्तृत विवेचन ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे.

प्रख्यात कादंबरीकार व दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मागील २६ वर्षे इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने 'दुर्ग दिन' साजरा केला जात आहे. दुर्ग भ्रमंती आणि लेखन क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळे त्यांना दुर्गमहर्षी म्हणून ओळखले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग स्थापत्यामध्ये केलेल्या अद्वितीय कार्याची जागतिक स्तरावर नोंद व्हावी, तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या कार्याचा समावेश व्हावा यासाठी प्रवीण भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. या विषयावरील संशोधन, ऐतिहासिक संदर्भ आणि दृश्य माध्यमांद्वारे सादर होणारा हा कार्यक्रम इतिहासप्रेमींसाठी विशेष ठरणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश