लिंकडइनच्या नवीन संशोधनातून निदर्शनास आले आहे की, भारतातील प्रोफेशनल्स नोकरीच्या फसवणुकीबाबत अधिक सावध झाले आहेत, पण दबावाखाली असताना हा धोका कायम आहे
लिंकडइनच्या नवीन संशोधनातून निदर्शनास आले आहे की, भारतातील प्रोफेशनल्स नोकरीच्या फसवणुकीबाबत अधिक सावध झाले आहेत, पण दबावाखाली असताना हा धोका कायम आहे
भारत, ६ मे २०२६: लिंक्डइनच्या नवीन संशोधनातून निदर्शनास आले आहे की, भारतातील प्रोफेशनल्स नोकरी शोधताना फसवणुकीच्या प्रकारांबाबत अधिक सावध होत आहेत. पाचपैकी चारपेक्षा जास्त (८२ टक्के) प्रोफेशनल्स आता कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी ते पद खरे आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी सावधगिरी बाळगतात. तसेच, निम्म्याहून अधिक (५३ टक्के) प्रोफेशनल्स म्हणतात की, एका वर्षापूर्वीच्या तुलनेत आता ते नोकरीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची अधिक शक्यता आहे.
लिंक्डइनच्या जॉब सर्च सेफ्टी पल्समधील निष्कर्षांवरून दिसून येते की, रोजगार बाजारपेठेत फसवणुकीबाबत जागरूकता वाढत आहे. पण, करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या तरुण प्रोफेशनल्ससाठी हा धोका अधिक सूक्ष्म आणि गंभीर स्वरूपाचा आहे. जागरूकता वाढत असली, तरी नवीन संधी मिळवण्याच्या दबावामुळे अनेकदा सावधगिरीकडे दुर्लक्ष केले जाते, विशेषतः करिअरच्या सुरुवातीच्या काळात हे प्रकर्षाने जाणवते.
करिअरच्या सुरुवातीच्या काळात अति-दडपणाचे प्रसंग सावधगिरीवर मात करू शकतात
सर्व वयोगटातील प्रोफेशनल्स आता अधिक सतर्क होत असले तरी, आकडेवारीवरून दिसून येते की, करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असणारे नोकरीसाधक अजूनही काही विशिष्ट प्रसंगी फसवणुकीला बळी पडू शकतात. ५४ टक्के जेन झी नोकरी शोधणाऱ्यांनी मान्य केले आहे की, एखादी संधी सोडण्यासारखी नसते किंवा अत्यंत महत्त्वाची वाटते, तेव्हा त्यांनी अनेकदा धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. यावरून हे् स्पष्ट होते की, घाई आणि स्पर्धा निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रभाव पाडू शकतात.
भारतातील जवळपास निम्मे (४९ टक्के) प्रोफेशनल्स म्हणतात की, ते नोकरीच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकता अडकता वाचले आहेत. या तुलनेत जेन एक्समध्ये हे प्रमाण ३६ टक्के आहे. यावरून निदर्शनास येते की, तरुण नोकरी शोधणाऱ्यांचा स्कॅमशी संबंधित परिस्थितींशी अधिक सामना होत आहे.
अर्ज सादर करण्यापूर्वीची वेळ सर्वात असुरक्षित असते
प्रोफेशनल्सच्या मते, नोकरी शोधताना (२० टक्के) किंवा एखाद्या रिक्रूटरकडून किंवा कंपनीकडून सुरुवातीचा संपर्क होतो (१८ टक्के), तेव्हा त्यांना फसवणुकीची सर्वाधिक चिंता वाटते. कारण या टप्प्यावर माहिती मर्यादित असते आणि अद्याप विश्वास प्रस्थापित झालेला नसतो.
लिंक्डइनच्या आकडेवारीमधून निदर्शनास येते की, फसवणूक करणारे संभाषणाला विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरून इतरत्र हलवून या सुरुवातीच्या क्षणांचा फायदा घेतात. रिपोर्ट केलेल्या फसवणुकीच्या प्रयत्नांपैकी ९० टक्के वेळा सदस्यांना वैयक्तिक मेसेजिंग अॅप्सवर नेले जाते, जिथे खात्यांची पडताळणी करणे कठीण असते आणि संभाषण अधिक अनौपचारिक वाटते. तसेच, प्लॅटफॉर्मबाहेर नेण्याचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रयत्न पहिल्याच मेसेजमध्ये केले जातात, म्हणजेच कोणताही संदर्भ किंवा विश्वास निर्माण होण्यापूर्वीच हे घडते.
लिंक्डइन नोकरी शोधातील जोखीम कमी करण्यासाठी कशी मदत करत आहे
लिंक्डइन सदस्यांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता यावेत यासाठी नोकरीच्या फसवणुकीविरुद्ध त्रिस्तरीय सुरक्षा कवच वापरते:
शोध: बनावट खाती, फसवणूक करणारे मेसेजेस आणि खोट्या नोकरीच्या जाहिराती सदस्यांना दिसण्यापूर्वीच त्यांना सक्रियपणे प्रतिबंध करते. याचा परिणाम म्हणून, शोधल्या गेलेल्या बहुतांश फसव्या हालचाली सदस्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवल्या जातात.
पडताळणी: महत्त्वाच्या क्षणी विश्वासाचे स्पष्ट संकेत प्रदान करते. यामध्ये कंपन्या, रिक्रूटर्स आणि नोकऱ्यांची पडताळणी समाविष्ट आहे. तसेच, लिंक्डइनच्या अंगभूत सुरक्षा संरक्षणात राहण्यासाठी लिंक्डइनवरून अर्ज करण्याची आणि संवाद साधण्याची सुविधा दिली जाते.
संरक्षण: लिंक्डइनने नोकरी शोधणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नुकतेच नवीन उपाय लागू केले आहेत. यामध्ये हाय-रिस्क (जास्त जोखीम असलेल्या) नोकरीच्या जाहिराती देणाऱ्यांसाठी ओळखपत्राची (आयडी) पडताळणी अनिवार्य करणे, फसवणूक वाटणाऱ्या पोस्ट व कमेंट्सची दृश्यमानता कमी करणे आणि प्रगत स्पॅम फिल्टरिंग व डिटेक्शन सिस्टम यांचा समावेश आहे.
लिंक्डइन इंडियाच्या लीगल अँड पब्लिक पॉलिसीच्या प्रमुख अदिती झा म्हणाल्या, “नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक आता ऑनलाइन नोकरी शोधण्याच्या अनुभवाचा सामान्य भाग बनत चालली आहे. आमच्या संशोधनातून निदर्शनास आले आहे की, प्रोफेशनल्समध्ये जागरूकता वाढत आहे, पण वेगाने बदलणाऱ्या आणि स्पर्धात्मक बाजारपेठेत या जागरूकतेनुसार, विशेषतः करिअरच्या सुरुवातीच्या काळात सातत्याने कृती करणे आव्हानात्मक असू शकते. म्हणून, नोकरीसाठी एक सुरक्षित परिसंस्था तयार करण्यासाठी फक्त जागरूकता पुरेशी नाही, त्यासाठी प्रबळ सुरक्षा उपाय, विश्वासाचे संकेत आणि प्लॅटफॉर्म, नियोक्ते व नोकरी साधक या सर्वांमध्ये सामायिक जबाबदारी असणे आवश्यक आहे. लिंक्डइनमध्ये आम्ही ही सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्यावर आणि प्रोफेशनल्सना अधिक आत्मविश्वास व विश्वासाने संधी शोधण्यास सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
नोकरी शोधणाऱ्यांसाठी व्यावहारिक सल्ले:
लिंक्डइन नोकरी शोधणाऱ्यांना खालील गोष्टींचे आवाहन करते:
● सुरुवातीच्या संवादावेळी थोडे थांबा, नोकरीची ऑफर किंवा आलेले मेसेजेस खूप घाईघाईचे किंवा अस्पष्ट वाटत असतील, तर त्वरित निर्णय न घेता विचार करा.
● नोकरीची जाहिरात कोणाकडून आली आहे हे तपासण्यासाठी कंपनीचे अधिकृत पेज, रिक्रूटरचे प्रोफाइल आणि त्यांच्या नावापुढील व्हेरिफिकेशन बॅज तपासा.
● प्लॅटफॉर्म सोडून इतरत्र जाण्याबाबत सावध राहा.
● संशयास्पद हालचालींची तक्रार करा, ज्यामुळे इतर सदस्यांचेही संरक्षण होण्यास मदत होईल.
Comments
Post a Comment