पवित्र देवालय देवालय चर्चमध्ये उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी अध्यात्मिक. शैक्षणिक आणि मनोरंजन शिबिर संपन्न
पवित्र देवालय देवालय चर्चमध्ये उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी अध्यात्मिक. शैक्षणिक आणि मनोरंजन शिबिर संपन्न
पवित्र नाम देवालय गुरवार पेठ पुणे येथील चर्चच्या वतीने मुलांच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले विशेष व्हॅकेशन बायबल स्कूल (VBS) शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले. या सात दिवसीय शिबिरामध्ये परिसरातील सुमारे ८० हून अधिक मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या शिबिरादरम्यान मुलांसाठी विविध प्रकारच्या आध्यात्मिक, शैक्षणिक आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बायबलमधील कथा, सुमधुर गाणी, कृतीगीते, आणि विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू (क्राफ्ट्स) बनवण्याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांच्यावर सुसंस्कार करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
शिबिराच्या सांगता समारंभाला पालकांची मोठी उपस्थिती लाभली होती. यावेळी मुलांनी शिबिरात शिकलेली गाणी, नृत्य आणि छोटे नाट्य प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. चर्चच्या मुख्य पाळक रेव्ह कॅरप, रेव्ह गायकवाड , रेव्ह आढाव व प्रमुख पाहुणे सौ. बबिता कवाडे ह्यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व ८० मुलांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहित केले. शिबिराच्या शेवटी सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्रे आणि आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाबद्दल सर्व पालकांनी चर्च प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत, शिबिराचे आयोजन रेव्ह कॅरप, रेव्ह गायकवाड , रेव्ह आढाव ,श्री. मनोज येवलेकर , प्राजक्ता पारोळ , विकास उमापती, विजया इंदुरकर, रोजमेरी साठे, निखिल टाकळकर , मालती नॉर्टन, जयमाला सूर्यवंशी, नूतन डनिएल, उर्मिला डिसोझा , रीना हर्जी,कविता उमापती, अनिता खामकर उज्वला साळवी, अरुणा जाधव, सार्थक राठोड, अनिकेत ताकवले, अलेक्स ताकवले, नोहा भोंगे, योना भोंगे, हर्षल आव्हाड, उदय राठोड, ऑस्टिन नवगिरे, मीनल सूर्यवंशी, कॅथेरिन गायकवाड, अण्णा उमापती, सियोन दुपटे, लावीन अमोलिक , अलिशा सूर्यवंशी, अंजल मिरपगार, सुमित वाकोडे, सचिन वाकोडे , पावन भोंगे , राजेंद्र पवार , संदीप गायकवाड , विल्सोन चक्रे. यांनी केले.
Comments
Post a Comment