द फिनिक्स मिल्स लिमिटेडकडून ‘फिनिक्स मार्केटसिटी पुणे’चे ‘फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्स’ म्हणून नवीन रूपात अनावरण
द फिनिक्स मिल्स लिमिटेडकडून ‘फिनिक्स मार्केटसिटी पुणे’चे ‘फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्स’ म्हणून नवीन रूपात अनावरण
ही नवी ओळख जागतिक दर्जाच्या ब्रँड्स, आधुनिक डिझाइन, उत्कृष्ट खाद्यसंस्कृती व मनोरंजन अनुभव आणि देशातील अग्रगण्य ग्राहक व जीवनशैली केंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या पुण्याच्या आकांक्षांचे प्रतीक आहे.
पुणे, २६ मे २०२६: The Phoenix Mills Limited (PML) ने पुण्यातील आपल्या प्रमुख रिटेल आणि लाइफस्टाइल डेस्टिनेशनपैकी एक असलेल्या फिनिक्स मार्केटसिटी पुणेचे ‘फिनिक्स अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ या नव्या ओळखीने रिब्रॅण्डिंग केल्याची घोषणा केली आहे. बदलत्या ग्राहक अपेक्षा आणि शहरी उपभोग संस्कृतीनुसार आपल्या प्रकल्पांचे सातत्याने उन्नतीकरण व प्रीमियमायझेशन करण्याच्या PML च्या व्यापक धोरणाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
गेल्या अनेक वर्षांत फिनिक्स मार्केटसिटी पुणे हे शहरातील एक महत्त्वाचे रिटेल आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित झाले असून, फॅशन, खाद्यसंस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ग्राहक अनुभवाला नव्या उंचीवर नेण्याचे कार्य या प्रकल्पाने केले आहे. ‘फिनिक्स अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ ही त्याच्या विकासाची पुढील पायरी असून, त्यामध्ये वेगळी आर्किटेक्चरल ओळख, अधिक आकर्षक ग्राहक अनुभव आणि प्रीमियम ब्रँड्सचा समावेश करण्यात आला आहे.
नव्या ओळखीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्रँड्स, आधुनिक व आकर्षक डिझाइन, सामाजिक आणि अनुभवप्रधान वातावरण यांचा प्रभाव दिसून येतो, जे पुण्याच्या बदलत्या लाइफस्टाइल संस्कृतीशी सुसंगत आहे. या परिवर्तनामुळे पश्चिम भारतातील अग्रगण्य रिटेल आणि लाइफस्टाइल डेस्टिनेशन म्हणून या प्रकल्पाची ओळख अधिक मजबूत होणार आहे.
या परिवर्तनाचा भाग म्हणून प्रकल्पामध्ये भव्य प्रवेशद्वार अनुभव, आकर्षक फसाड डिझाइन आणि संपूर्ण दृश्य व जागात्मक सौंदर्य वृद्धिंगत करणारे विविध डिझाइन साकारण्यात करण्यात आले आहेत. तसेच, रिटेल, फूड आणि मनोरंजन यांचा एकत्रित जागतिक दर्जाचा अनुभव देणाऱ्या मिश्र-वापर (Mixed-use) शहरी प्रकल्पांच्या निर्मितीवर PML चा भर असल्याचेही या रेब्रॅण्डिंग दिसून येते.
आज ‘फिनिक्स अव्हेन्यू ऑफ स्टार्स’मध्ये UNIQLO, Michael Kors, Victoria’s Secret, Armani Exchange यांसारख्या आंतरराष्ट्रीय आणि प्रीमियम ब्रँड्ससह अनेक नामांकित ब्रँड्स उपलब्ध आहेत. तसेच लक्झरी घड्याळे व दागिने विभाग, उत्कृष्ट खाद्यसंस्कृती आणि अनुभवप्रधान रिटेल संकल्पनांमुळे या ठिकाणाचा प्रीमियम दर्जा अधिक वृद्धिंगत झाला आहे. अलीकडेच पुण्यातील पहिले IKEA स्टोअर येथे सुरू झाले असून, लवकरच Coach, Hugo, Swatch आणि LEGO सारखे जागतिक ब्रँड्सही येथे सुरू होणार आहेत.
रिटेलच्या पलीकडे जाऊन ‘फिनिक्स अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ हे भव्य कार्यक्रम, ब्रँड ऍक्टिव्हशन्स, उत्कृष्ट खाद्य अनुभव आणि मनोरंजन उपक्रमांद्वारे पुण्याच्या वेगाने बदलणाऱ्या शहरी जीवनशैलीला नवा आयाम देत आहे. हे परिवर्तन प्रकल्पाच्या व्यापकता, प्रीमियम स्थान आणि दीर्घकालीन विकासदृष्टीचे प्रतीक आहे.
या परिवर्तनाबाबत प्रतिक्रिया देताना रश्मी सेन, होल टाईम डायरेक्टर आणि सी ई ओ - मॉल्स म्हणाल्या, “पुण्याच्या विकासासोबतच फिनिक्स मार्केटसिटी पुणेनेही गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली आहे. ‘फिनिक्स अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ हे आमच्या रिटेल डेस्टिनेशन्सना जागतिक दर्जानुसार अधिक प्रीमियम बनवण्याच्या आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांनुसार त्यांना विकसित करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अधिक प्रभावी डिझाइन, प्रीमियम ब्रँड पोर्टफोलिओ आणि वेगळा ग्राहक अनुभव यांसह ‘फिनिक्स अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ हे जागतिक दर्जाचे शहरी रिटेल वातावरण निर्माण करण्याच्या PML च्या दृष्टीकोनातील पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
फिनिक्स अव्हेन्यू ऑफ स्टार्स विषयी
पूर्वी फिनिक्स मार्केटसिटी पुणे म्हणून ओळखले जाणारे ‘फिनिक्स अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ हे विमान नगर येथे स्थित आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाने पुणे आणि आसपासच्या बाजारपेठांमधील मोठ्या ग्राहकवर्गासाठी अग्रगण्य रिटेल आणि लाइफस्टाइल डेस्टिनेशन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सुमारे १.२ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळामध्ये पसरलेल्या या प्रकल्पात फॅशन, ब्युटी, खाद्यसंस्कृती, मनोरंजन आणि लाइफस्टाइल क्षेत्रातील ३०० हून अधिक स्टोअर्स आहेत.
द फिनिक्स मिल्स लिमिटेड विषयी
The Phoenix Mills Limited ही भारतातील अग्रगण्य रिटेल-आधारित मिश्र-वापर प्रकल्पांची मालक, ऑपरेटर आणि विकसक कंपनी आहे. कंपनीचे प्रकल्प रिटेल, हॉस्पिटॅलिटी, कमर्शियल ऑफिसेस आणि निवासी विकास या विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहेत. भारतातील आठ प्रमुख शहरांमध्ये कंपनीकडे ११ दशलक्ष चौरस फूटांहून अधिक कार्यरत रिटेल पोर्टफोलिओ असून, पुढील काळात आणखी ७ दशलक्ष चौरस फूट क्षेत्र विकसित करण्याचे काम सुरू आहे.
Comments
Post a Comment