पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमण, सई कुलकर्णी यांना विजेतेपद




पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमण, सई कुलकर्णी यांना विजेतेपद 
 
पुणे, 29 मे 2026: शारदा स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात शौरेन सोमण याने, तर मुलींच्या गटात सई कुलकर्णी हिने विजेतेपद संपादन केले. 

शारदा स्पोर्ट्स सेंटर येथील टेबल टेनिस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित शौरेन सोमण याने पाचव्या मानांकित निशाद लेलेचा 11-8,11-4,8-11,11-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. शौरेन हा एमआयटी येथे अकरावी इयत्तेत शिकत असून एम्स टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. याच मुलींच्या गटात अंतिम सामन्यात अव्वल मानांकित सई कुलकर्णीने सातव्या मानांकित दिया शिंदेचा 11-6,11-7,11-5 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. सई हि मिलेनियम नॅशनल शाळेत अकरावी इयत्तेत शिकत असून चॅम्पियन्स टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक लाँथोओइब यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते . 

13 वर्षांखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित अनन्या पाटील हिने दुसऱ्या मानांकित अहाना गोडबोलेचा 11-7,11-9,11-8 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित स्पृहा गुजरने आठव्या मानांकित एरिना अहमदला 9-11,11-3,11-8,11-8 असे पराभूत केले. चौथ्या मानांकित श्रीनिका उमेकरने पाचव्या मानांकित कार्तिकी नढेवर 11-9,11-7,11-8 असा विजय मिळवला. 

निकाल: 13 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
निरज नांदेडे[1] वि.वि.स्वयम कोठावळे[8] 11-8,11-5,11-7
तनय इंगवले[5] वि.वि. ऋग्वेद दांडेकर[4] 11-5,11-4,11-7
नभ पांचोलिया [3] वि.वि.इशान ठक्कर 11-9,11-8,11-9 
वरदन कोलते[2] वि.वि.ओंकार अभ्यंकर 11-6,11-13,12-10,11-6;

13वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
स्पृहा गुजर[1] वि.वि.एरिना अहमद[8]9-11,11-3,11-8,11-8
श्रीनिका उमेकर[4] वि.वि.कार्तिकी नढे[5] 11-9,11-7,11-8 
शरण्या पटवर्धन[3] वि.वि.वृंदा महापदी 11-6,8-11,11-8,12-10
अनन्या पाटील वि.वि.अहाना गोडबोले[2] 11-7,11-9,11-8

17 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
निशाद लेले[5] वि.वि.अनुज फुलसुंदर[4]11-9,10-12,9-11,11/8,11-9
नील नवरे[3] वि.वि.स्वरूप भाडळकर[6] 11-9,12-10,11-6
शौरेन सोमण[2] वि.वि.शारंग गवळी 7-11,11-5,11-7,11-7
अद्विक कदम वि.वि.एल्विस टॉम 3-11,11-5,11-7,11-8
उपांत्य फेरी:
निशाद लेले[5] वि.वि.अद्विक कदम 11-6,7-11,11-5,11-4
शौरेन सोमण[2] वि.वि.नील नवरे[3]5-11,11-4,14-12,11-9
अंतिम फेरी: शौरेन सोमण[2] वि.वि. निशाद लेले[5]11-8,11-4,8-11,11-6;
  
17 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
सई कुलकर्णी[1] वि.वि.श्रेया कोठारी[8]11-9,14-12,11-3 
श्रेया गायकवाड[4] वि.वि.मृदुला सुरवसे[5]12-10,11-7,11-7
आद्या गवात्रे[3] वि.वि.नीरजा देशमुख[6]11-4,11-6,11-4
दिया शिंदे[7] वि.वि.स्वरदा साने[2]11-4,11-7,11-8
उपांत्य फेरी:
सई कुलकर्णी[1] वि.वि.श्रेया गायकवाड[4]11-3,11-2,11-5 
दिया शिंदे[7] वि.वि. आद्या गवात्रे[3]7-11,11-6,15-17,11-6,11-9
अंतिम फेरी: सई कुलकर्णी[1] वि.वि.-दिया शिंदे[7] 11-6,11-7,11-5
 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश