महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे साजरा.
*महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे साजरा.*
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष *मा. अरविंद शिंदे* यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
आपल्या भाषणात मा. अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने पुढाकार घेऊन आंदोलने केली. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना ६ फेब्रुवारी १९५६ रोजी कै. केशवरावजी जेधे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात स्थापना झाली. या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनास एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, श्रीपाद अमृत डांगे, पी. के. अत्रे, भाई उध्दवराव पाटील व अनेक नेत्यांनी भाग घेतला. या आंदोलनात १०५ जणांना आपला जीव गमवावा लागला व ते हुतात्मे झाले. ४ मे १८८६ रोजी शिकागोमध्ये कामगारांनी संप केला. त्या कामगारांची प्रमुख मागणी अशी होती की, कामगारांना त्यांच्या २४ तासांपैकी ८ तास काम, ८ तास विश्रांती व ८ तास करमवणूकीसाठी वेळ द्यावा. त्यांच्या या संपावर पोलीसांनी गोळीबार केला व चार कामगार मृत्यूमुखी पडले. जगभरात १ मे आंततरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आणि अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर बॉम्बे पुनर्रचना कायद्यानुसार मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली, ज्याची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो ’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत माजी आमदार दिप्ती चवधरी, प्रदेश खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी नगरसेवक अजित दरेकर, बाळासाहेब अमराळे, शहर उपाध्यक्षा प्राची दुधाणे, अर्चना शहा, सिमा सावंत, राज अंबिके, द. स. पोळेकर, आबा जगताप, रमेश पवळे, प्रवीण करपे, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्हाळ, चेतन अगरवाल, सेवादलाचे मुख्य संघटक लतेंद्र भिंगारे, प्रदेशचे रवि म्हसकर, शशिकांत बिबवे, राजाभाऊ कदम, रंजना रजपूत, लता जाधव, शैला कदम, वैशाली माटे, हरिदास अडसूळ, उत्तम आल्हाट, बाबासाहेब जाधव, प्रल्हाद खेसे, मीना कदम, सरोजिनी काटे, सुरेश राठोड, आसिफ शेख, उदय लेले, राहुल शर्मा, फिरोज शेख, दिलीप लोळगे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment