द वंडर स्कूल, पुणेतर्फे न्यूरोडायव्हर्जंट मुलांसाठी विशेष वेबिनारचे आयोजन

द वंडर स्कूल, पुणेतर्फे न्यूरोडायव्हर्जंट मुलांसाठी विशेष वेबिनारचे आयोजन

 

पुणे, दि. ११ मे २०२६ : न्यूरोडायव्हर्जन्सबाबत अधिक संवेदनशीलता, समज आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्याच्या उद्देशाने द वंडर स्कूल, पुणेतर्फे ‘द अनलेबलिंग प्रोजेक्ट’ या विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा थेट चर्चासत्र स्वरूपातील वेबिनार बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

“होप और हायीप : द ट्रुथ अबाऊट अल्टरनेटीव्ह मेडिसिन अँड रेमेडीएस फॉर न्यूरोडायव्हर्जट चिल्ड्रेन” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सत्रात शिक्षण आणि सर्वांगीण आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार असून, न्यूरोडायव्हर्जंट मुलांना पारंपरिक चौकटींपलीकडे जाऊन अधिक प्रभावी पद्धतीने कशाप्रकारे मदत करता येईल, यावर चर्चा होणार आहे.

 

या चर्चासत्राचे मार्गदर्शन होमिओपॅथिक तज्ज्ञ, शिक्षिका आणि वक्ते डॉ. अनुम झहीर करणार आहेत. त्यांच्यासोबत आविष्कारच्या संचालिका आणि पॉटर्स अर्थ एज्युकेशन रिसर्च सेंटरच्या सह-संस्थापिका अनामिका दासगुप्ता संवाद साधणार आहेत. या चर्चेत पर्यायी उपचारपद्धतींविषयीचे सामान्य प्रश्न, त्यासंदर्भातील समज-गैरसमज तसेच वास्तव परिस्थिती यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच न्यूरोडायव्हर्जंट मुलांसोबत काम करणाऱ्या पालक, शिक्षक आणि कुटुंबीयांसाठी उपयुक्त मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

 

हा कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थितांसाठी मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आला असला तरी शिक्षक, पालक, थेरपिस्ट आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना ऑनलाईन माध्यमातून सहभागी होता येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.

 

या वेबिनारमधून सहभागीांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नव्या दृष्टीकोनांची माहिती, सकारात्मक चर्चा आणि न्यूरोडायव्हर्जंट मुलांसाठी अधिक समजूतदार व सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश