प्रतिभा समाजासाठी वरदान तर कलावंतासाठी शाप : कौशल इनामदार


प्रतिभा समाजासाठी वरदान तर कलावंतासाठी शाप : कौशल इनामदार

प्रतिभेऐवजी सगळीकडे सादरीकरणाचे स्तोम : कौशल इनामदार

गझलविधा समूहातर्फे ‘गझलविधा’ संमेलनात २५ गझलकारांचे सादरीकरण

पुणे : शब्दांमधून शब्दांपलिकडचे सांगण्याचे कार्य कवी करत असतात. त्यामुळे चांगला गझलकार होण्यासाठी चांगला कवी असणे आवश्यक आहे. प्रतिभावंतांची प्रतिभा ही समाजासाठी वरदान असली तरी कलावंताला असलेला तो शाप असतो. कवी-गझलकार-लेखकाने आपण का लिहितो याचा विचार परखडपणे केला तर तो कागदाला लेखणी लावताना दचकून जाऊ शकतो. आजच्या साहित्यिकाकडे ते दचकणे दिसत नाही पण सगळीकडे सादरीकरणाचे स्तोम माजलेले दिसते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केले.

गझलविधा समूहातर्फे रविवारी (दि. १७) एक दिवसीय ‘गझलविधा’ या गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात कौशल इनामदार अध्यक्षपदावरून बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ गझलकार डॉ. कैलास गायकवाड, गझलविधा समूहाचे निमंत्रक भूषण कटककर, शाम खामकर, डॉ. दिपील पांढरपट्टे मंचावर होते. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे संमेलन आयोजित करण्यात आले होते. २५ पेक्षा जास्त गझलकारांचा संमेलनात सहभाग होता.

प्रास्ताविकात शाम खामकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली तर भूषण कटककर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

कविता ज्याप्रमाणे व्यक्त होण्याची मुभा देते त्याच वेळेला अव्यक्त होण्याची, लपविण्याची देखील मुभा देत असते, असे सांगून कौशल इनामदार म्हणाले, फार कमी कलावंतांना प्रतिभा मिळते. दु:खी गाण्यांची आज आक्रोश गीते झालेली दिसतात. कलाकाराने जे अंतर्मुख होऊन अभ्यासायचे असते तेच मोठ्या प्रमाणात बाहेर फेकले जात आहे.

डॉ. कैलास गायकवाड म्हणाले, आपण सर्वजण मनोव्यापारी आहोत. भाषा विकसित झाल्यानंतर कलेची निर्मिती झाली. कला हे व्यक्त होण्यासाठीचे मोठे साधन असून त्यात साहित्यनिर्मितीला वरचे स्थान आहे.

डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले, गझलकाराने सातत्याने वाचन करणे आणि दुसऱ्याला ऐकणे आवश्यक आहे. स्वत:चे दु:ख न मांडता जगाचो दु:खही मांडले पाहिजे.

प्राजक्ता पटवर्धन यांच्या ‘निव्वळ योगायोग’ या संग्रहाचा सन्मान कौशल इनामदार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. कौशल इनामदार यांचे स्वागत मानपत्र देऊन करण्यात आले.

गझल संमेलनाचे संयोजन प्राजक्ता वेदपाठक, डॉ. स्नेहल कुलकर्णी, भूषण कटककर, जनार्दन म्हात्रे यांनी केले. प्राजक्ता पटवर्धन, वैशाली माळी, वैजयंती आपटे, निरुपमा महाजन, मुक्ता भुजबले, जनार्दन म्हात्रे, डॉ शिवाजी काळे, दास पाटील, अमिता पैठणकर यांचे सहकार्य लाभले. गझल स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव या वेळी करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश