पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४९वा वर्धापन दिन बुधवारी‘विकसित भारत’ संकल्पना : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा होणार गौरव


पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४९वा वर्धापन दिन बुधवारी

‘विकसित भारत’ संकल्पना : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा होणार गौरव

पुणे : पुणे मॅनेजमेंट असोसिएशन (पीएमए) ही संस्था नेतृत्व, नवोपक्रम आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी पाच दशकांपासून सातत्याने कार्यरत आहे. संस्थेचा ४९वा वर्धापन दिन ‘विकसित भारत’ या प्रेरणादायी संकल्पनेवर बुधवार, दि. २७ मे रोजी साजरा होत असून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे यांनी आज (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली. असोसिएशनचे कार्यकारी समितीचे विश्वस्त प्रसाद मिरासदार, राहुल जोशी, सुनील हरपुळे उपस्थित होते.

दि. २७ मे १९७७ रोजी पद्मभूषण एस. एल. किर्लोस्कर, व्ही. एस. वैद्य, सी. एस. किर्लोस्कर, डॉ. एन. ए. कल्याणी, सी. व्ही. जोग आणि इतर दिग्गज उद्योगनेत्यांच्या दूरदृष्टीतून पीएमएची स्थापना झाली. “समाजाला परत देण्याचा आनंद” या ब्रीदवाक्याने प्रेरित होत पीएमए समाजासाठी सक्षम नेतृत्व आणि उद्योगाभिमुख प्रतिभा घडविण्याचे कार्य सातत्याने करत आहे.

विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज बनविणे, व्यावसायिक, उद्योजक आणि भावी नेत्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच नेटवर्किंग, ज्ञानविनिमय, मार्गदर्शन आणि व्यवसाय वृद्धीसाठी संधी निर्माण करणे हे पीएमएचे प्रमुख उद्दिष्ट आहे. १० पेक्षा अधिक उत्कृष्टता केंद्रे आणि २०० हून अधिक अनुभवी उद्योगतज्ज्ञांच्या सहकार्याने पीएमए नियमितपणे परिसंवाद, कार्यशाळा, परिषद आणि नेतृत्वविषयक उपक्रम आयोजित करत असते.

पीएमएचा ४९वा स्थापना दिन समारंभ दि. २७ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता सीपीआर ऑडिटोरियम, पाषाण रोड, मॉडर्न कॉलेज जवळ, गणेशखिंड येथे आयोजित करण्यात आला आहे. व्यावसायिक, उद्योजक, उद्योगक्षेत्रातील मान्यवर, नवउद्योजक, विद्यार्थी आणि परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम प्रेरणा, संधी आणि सहकार्याचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून पिट्टी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पिट्टी, विशेष अतिथी म्हणून निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, पूना ॲब्रेसिव्हजचे संस्थापक व अध्यक्ष विरेंद्र सू, बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक प्रसेनजीत फडणवीस, निबे इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांची उपस्थिती असणार आहे.

विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव या निमित्ताने करण्यात येणार आहे. यात वर्षातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्था – आयएमडीआर, उद्योजकांना सहाय्य करणारी उत्कृष्ट संस्था – टाय (द इंडस आंत्रप्रेन्युअर्स), वर्षातील उत्कृष्ट निर्यातदार प्रशांत बोरा, सामाजिक प्रभाव निर्माण करणारी संस्था – स्वरूपवर्धिनी, नेतृत्व क्षेत्रातील उल्लेखनीय महिला - श्वेता शालिनी, प्रथम पिढीतील यशस्वी उद्योजक - गौरव त्रिपाठी, वर्षातील उत्कृष्टता केंद्र - महाट्रेनर्स यांचा समावेश आहे.

नवीन विचार जाणून घेण्यासाठी, प्रेरणादायी व्यक्तींशी जोडण्यासाठी, व्यवसाय वृद्धीसाठी आणि “विकसित भारत” घडविण्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी दि. २७ मे २०२७ पर्यंत दर महिन्याच्या २७ तारखेला विविध नेटवर्किंग उपक्रम, ज्ञानवर्धक कार्यक्रम, उद्योग सहकार्य, व्यावसायिक संवाद आणि व्यवसाय वृद्धीला चालना देणाऱ्या संधी आयोजित 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश