सखोल अभ्यासाअभावी ऐतिहासिक दस्तऐवज अजूनही दुर्लक्षित राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक व मोडी लिपी तज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांचे मत; इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राज मेमाणे यांच्या ‘इतिहासातील भुतावळ’ पुस्तकाचे प्रकाशन


  सखोल अभ्यासाअभावी ऐतिहासिक दस्तऐवज अजूनही दुर्लक्षित  
राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक व मोडी लिपी तज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांचे मत; इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राज मेमाणे यांच्या ‘इतिहासातील भुतावळ’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना तो चारही बाजूंनी पडताळून पाहणे आवश्यक आहे. आज एखाद्या विषयावर सखोल अभ्यास करण्याची तयारी काही प्रमाणात दिसत असली, तरी प्रत्यक्षात त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी कमी आहे. मोडी अभ्यासकांची संख्या कमी असल्याने आजही हजारो कागदपत्रांचा सखोल अभ्यास झालेला नाही. हे पुस्तक इतिहास अभ्यासकांना नवा दृष्टिकोन देणारे ठरेल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक मोडी लिपी तज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांनी व्यक्त केले.

मल्हार पब्लिकेशन, पुणे या प्रकाशन संस्थेच्या वतीने इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राज मेमाणे लिखित ‘इतिहासातील भुतावळ’ या पुस्तकाचे प्रकाशन सदाशिव पेठेतील भारतीय विचार साधना सभागृहात झाले. यावेळी इतिहास संशोधक शिवराम कार्लेकर, इतिहास संशोधक राज मेमाणे आदी उपस्थित होते. यावेळी राज मेमाणे यांच्या ‘मराठ्यांचे आरमार : द धुळप एरा’ या इंग्रजी आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले.

शिवराम कार्लेकर म्हणाले, मराठा इतिहासाच्या अभ्यासात केवळ लढाया, तह आणि करारनाम्यांपुरते मर्यादित न राहता समाजजीवन, अर्थकारण, सरकारी यंत्रणा, स्त्रियांचे स्थान आणि सामान्य माणसाची भूमिका अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यासाठी नवे इतिहास अभ्यासक घडणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये आधुनिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती आणि साधनांचा सूक्ष्म अर्थ लावण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर वेगळ्या विषयावर आधारित इतिहासाचा सखोल अभ्यास मांडणारे हे पुस्तक इतिहास अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे, असे ही त्यांनी सांगितले.

राज मेमाणे म्हणाले, आजच्या काळातही देवधर्माच्या, भूत-खेतांच्या नावाखाली फसवणूक होताना दिसते. पूर्वीच्या काळी समाज वैचारिकदृष्ट्या फारसा पुढारलेला नव्हता. त्यामुळे भूतावळांबाबतच्या संकल्पना, भूतांचे प्रकार, त्यावरून होणारी फसवणूक, भुतांना नियंत्रणात ठेवणारी सरकारी यंत्रणा आणि इतिहासातील त्यासंबंधीच्या नोंदी यांचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश