देशाची एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिराजी, राजीवजी गांधी यांचे बलिदान - जेष्ठ नेते ऊल्हासदादा पवार

*देशाची एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिराजी, राजीवजी गांधी यांचे बलिदान - जेष्ठ नेते ऊल्हासदादा पवार*

*राजीव गांधी स्मारक समिती तर्फे “भारतरत्न राजीव गांधी” स्मृती अभिवादन कार्यक्रम संपन्न..!*

*‘पंतप्रधान पदाची उंची व देशाची प्रतिष्ठा’ भारतरत्न राजीव गांधी यांनी आपल्या कार्यकाळात स्व कर्तृत्वाने वाढवली - गोपाळदादा तिवारी*


पुणे दि २१ मे - स्वातंत्र्योत्तर भारतात पं.  नेहरू, शास्त्रीजी, इंदीराजीं पासून आलेला आधुनिकतेचा व तंत्रज्ञानाचा वसा आणि वारसा राजीव गांधींनी तसाच पुढे नेला. महात्मा गांधी, सरदार पटेलांच्या ‘स्वातंत्र्य लढ्याचा’ मुळ हेतू हा देशाचे ऐक्य, अखंडता, एकात्मता, समता, मानवता, सार्वभौमत्व व लोकशाही तत्वांची बूज प्रस्थापित करणे व देशातील शेवटच्या माणसाचा सर्वांगीण विकास हाच होता. यासाठी इंदिराजी, राजीवजी गांधी यांनी प्रसंगी प्राणांची आहुती दिली हे गांधी कुटुबियांचे योगदान न विसरण्याजोगे आहे असे उद्गार काँग्रेस चे जेष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी भारतरत्न दिवंगत पंतप्रधान राजीव गांधीं यांना अभिवादनपर कार्यक्रमात केले.

कात्रज येथील प्राणी संग्रहालया समोरील राजीव गांधी याचे प्रतिमेस पुष्पहार - अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. त्यांचे हस्ते राजीव गांधी यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.  या वेळी कवयित्री श्रध्दा बेलसरे यांची स्व राजीव गांधी यांचे वरील कविता ही उल्हास दादांनी वाचून दाखवली..!

राजीव गांधींनी अल्पकाळात देशाचे सामर्थ्य, प्रतिष्ठा व पंतप्रधानपदाची उंची’ आपल्या कर्तुत्वाने वाढवली व जगात अलीप्ततावादी राष्ट्रांचे नेतृत्व केल्याचे” राजीव गांधी स्मारक समिती’चे संस्थापक अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी स्वागत प्रास्ताविक प्रसंगी सांगितले. ते पुढे म्हणाले की देशास २१ व्या शतकाची दृष्टी दाखवणाऱ्या राजीव गांधींनी देशात आणलेल्या ‘संगणक व मोबाईल क्रांती’ मुळेच् कोरोना सारख्या संकटात ही देश ‘वर्क फ्रॅाम होम’ करू शकला, याचे निर्विवाद श्रेय राजीव गांधींनाच जाते.

या प्रसंगी..  पुणे जिल्हा अध्यक्ष लहुआण्णा निवंगुणे, राजीवजी जगताप, सुभाषशेठ थोरवे, रामभाऊ शेडगे, नंदुशेठ पापळ, आबा जगताप, भोला वांजळे, द स पोळेकर, धनंजय भिलारे, ॲड स्वप्नील जगताप, सुभाष जेधे, अशोक काळे, गणेश शिंदे, ॲड सचिन अडसुळ, संजय अभंग, गणेश मोरे, ॲड विजय तिकोणे, शिवाजी भोईटे, महेश हराळे, सौ मनिषा फाटे, रमेश सोनकांबळे, विकास दवे, ऊदय लेले, राजेश सुतार, दिलीप लोळगे, गोरख पळसकर, नरसिंह अंदोली, बाळासाहेब पवार, हरिदास अडसुळ, बाळासाहेब प्रताप, इ कार्यकर्ते मित्र परीवार, पुणे उपस्थित होते.

या वेळी मा उल्हासदादा पवार व पुणे जिल्हा दक्षीण अध्यक्ष लहुआण्णा निवंगुणे यांना शाल व तुळशीचे रोप देऊन राजीव जगताप व सुभाष थोरवे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. संजय अभंग, धनंजय भिलारे, गणेश मोरे इ नी कार्यक्रमाचे आयोजन केले तर भोला वांजळे यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश