अग्रवाल समाजचे भूषण राजेश अग्रवाल यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी निवड- संपूर्ण पुणे अग्रवाल समाजासाठी अभिमानाचा क्षण
पुणे अग्रवाल समाजचे भूषण राजेश अग्रवाल यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी निवड-
संपूर्ण पुणे अग्रवाल समाजासाठी अभिमानाचा क्षण
लायंस क्लब चे लोकप्रिय, कार्यक्षम व दूरदृष्टी असलेले जिल्हा गव्हर्नर, लायन राजेश अग्रवाल, पुणे यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्य , तसेच राष्ट्रीय संघटन संचालक या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि जबाबदारीच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
ही नियुक्ती केवळ एका व्यक्तीच्या यशाची नोंद नसून, अग्रवाल समाजाच्या नेतृत्वक्षमतेची, सामाजिक बांधिलकीची आणि राष्ट्रीय पातळीवरील वाढत्या प्रभावाची साक्ष आहे.
अखिल भारतीय अग्रवाल संमेलन ही भारतातीलच नव्हे तर जगभरातील अग्रवाल समाजाचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात जुनी, सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्रभावी संस्था आहे. सुमारे ६ कोटींहून अधिक अग्रवाल बांधवांना एकत्रितपणे जोडणाऱ्या या संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, आर्थिक आणि राष्ट्रीय विकासाच्या क्षेत्रात गेली अनेक दशके उल्लेखनीय कार्य केले आहे.
अशा या भव्य संस्थेच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये स्थान मिळणे ही अत्यंत सन्मानाची बाब असून, लायन राजेश अग्रवाल यांच्या व्यक्तिमत्त्वाची, नेतृत्वगुणांची, संघटन कौशल्याची आणि समाजसेवेप्रती असलेल्या त्यांच्या अखंड समर्पणाची ही राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल आहे.
राष्ट्रीय संघटन संचालक या नात्याने त्यांच्यावर महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या विस्तीर्ण प्रदेशातील संघटन विस्तार, सदस्यवृद्धी, नवीन शाखांची स्थापना, युवा सहभाग वाढविणे, महिला सक्षमीकरण, सामाजिक उपक्रमांचे समन्वयन आणि समाजाला राष्ट्रीय ध्येयाशी जोडण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
लायन राजेश अग्रवाल यांनी आपल्या व्यावसायिक, सामाजिक आणि लायन्स चळवळीतील कार्यातून नेहमीच प्रभावी नेतृत्व, प्रामाणिक कार्यपद्धती आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन यांचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा ३२३४-डी२ ने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा लाभ आता राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण अग्रवाल समाजाला मिळणार आहे.
ही नियुक्ती पुणे शहरासाठी, महाराष्ट्रासाठी, लायन्स परिवारासाठी आणि विशेषतः अग्रवाल समाजासाठी अभिमानाची व प्रेरणादायी घटना आहे. समाजातील युवकांसाठी हे यश नेतृत्व, समर्पण आणि सातत्यपूर्ण कार्य यांद्वारे राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची प्रेरणा देणारे आहे.
Comments
Post a Comment