अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात सामंजस्य करार

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात सामंजस्य करार

मुंबई : उच्च शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात नवे पर्व सुरू करत अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ आणि डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. २१ मे रोजी झालेल्या या करारांमुळे शैक्षणिक सहकार्य, अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाधारित नवकल्पनांना नवी चालना मिळणार आहे.
 कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती विश्लेषण शास्त्र, सायबर तंत्रज्ञान आणि न्यायवैद्यक विज्ञान यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यावर या सहकार्याचा भर राहणार आहे. करार स्वाक्षरी सोहळ्यास होते. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. रजनीश कामत, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. विलास पाध्ये उपस्थित होते. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, कुलसचिव डॉ. सुधाकर शिंदे, महाव्यवस्थापक प्रिसिला विल्सन, डॉ. प्रशांत कुंभारकर आणि डॉ. सुरेश कुमार उपस्थित होते.
 शैक्षणिक भागीदारीसोबतच अजिंक्य डीवाय पाटील डिफेन्स रिसर्च इनोव्हेशन फाउंडेशन ( (डीआरआयएफ)
 आणि डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ यांच्यात स्वतंत्र सहकार्य करार करण्यात आला आहे.
या भागीदारीअंतर्गत संयुक्त संशोधन प्रकल्प, कार्यशाळा, परिषद, चर्चासत्रे तसेच प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि प्रशिक्षण सुविधांचा परस्पर वापर करण्यासही प्रोत्साहन दिले जाणार आहे. इंटर्नशिप, प्रत्यक्ष प्रकल्प, कौशल्य विकास कार्यक्रम, नवउद्योगांना प्रोत्साहन, पेटंट निर्मिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यांद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेलाही बळ मिळणार आहे.
“संशोधन, नवोपक्रम आणि आंतरशाखीय शिक्षणासाठी सक्षम परिसंस्था उभारण्याच्या दिशेने हा करार महत्त्वपूर्ण टप्पा आहे. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठासोबतच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान आणि अनुप्रयुक्त विज्ञान क्षेत्रात नवे क्षितिज गाठण्याची संधी मिळेल. अजिंक्य डीवाय पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ अजिंक्य डी वाय. पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आम्ही नवोपक्रम, उद्योजकता आणि जागतिक दर्जाच्या संशोधनाला चालना देणारे भविष्याभिमुख शैक्षणिक वातावरण उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. जैन यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश