बिटिया फाउंडेशन गुलाबो गॅंग च्या वतीने पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांना पुण्यात गेल्या २२ दिवसांमध्ये १२३ महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या गंभीर विषयावर निवेदन देण्यात आले.



आज सकाळी 11.30
वाजता आम्ही बिटिया फाउंडेशन गुलाबो गॅंग च्या वतीने पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांना पुण्यात गेल्या २२ दिवसांमध्ये १२३ महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या गंभीर विषयावर निवेदन देण्यात आले.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “महिला आणि मुली सुरक्षित नसतील तर समाज सुरक्षित राहू शकत नाही,”अशी भावना सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी आयुक्तांशी बरी चर्चा झाली आणि वेगवेगळ्या विषयावर आयुक्तांनी आम्हाला सर्व माहिती दिली आणि महिला सुरक्षेबाबत अजून काय कठोर भूमिका घेता येईल त्याची आम्ही मीटिंग लावत आहोत आणि त्याप्रमाणे कारवाई होईल असे आश्वासनही दिले.
यावेळी निवेदन देताना संगीता तिवारी, दत्ता बहिरट, योगेश पवार, शोभा पणीकर, सोनिया ओव्हाळ, भारती लोंढे आणि निलेश पवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश