महामाता रमामाईंचा त्याग व समर्पण भारतीय संस्कृतीचे अधिष्ठान : डॉ. श्रीपाल सबनीसरमाईरत्न पुरस्काराने संगीता माळवदकर, अरुण ठाकूर यांचा गौरव

महामाता रमामाईंचा त्याग व समर्पण भारतीय संस्कृतीचे अधिष्ठान : डॉ. श्रीपाल सबनीस
रमाईरत्न पुरस्काराने संगीता माळवदकर, अरुण ठाकूर यांचा गौरव

पुणे : महापुरुष व महामाता कोणत्या तरी जातीत जन्मतात पण त्यांचे कर्तृत्व जात-धर्मापलिकडचे असते. माता रमामाई यांचा त्याग व समर्पण भारतीय संस्कृतीचे अधिष्ठान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या ९१व्या स्मृतिदिनानिमित्त महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे रमाईरत्न पुरस्काराने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या महिला विभाग प्रमुख संगीता माळवदकर आणि खडकी ॲम्युनिशन फॅक्टरीचे मुख्य महाप्रबंधक अरुण ठाकूर यांचा आज (दि. २७) डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. उपमहापौर परशुराम वाडेकर, रमाई महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष लता राजगुरू, संयोजक विठ्ठल गायकवाड, रवींद्र माळवदकर, राजेंद्र वागसकर आदी उपस्थित होते. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, अशुद्ध धर्मकारण आणि भ्रष्ट राजकारण यामुळे समाजात संभ्रम वाढला आहे. अशा परिस्थितीत हिंदू आणि बौद्ध समाजाला जोणाऱ्या महामाता रमाई या दुवा आहेत.
परशुराम वाडेकर म्हणाले, माळवदकर कुटुंबिय शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा पुढे नेत आहे. संगीता माळवदर यांचा रमाईरत्न पुरस्कार देऊन झालेला गौरव अतिशय योग्य आहे. महामाता रमाई यांच्या स्मारकाच्या विकासासाठी महापालिकेतर्फे आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. पुढील जयंतीपर्यंत स्मारकाचे रूप पालटलेले पहायला मिळेल.
सत्काराला उत्तर देताना अरुण ठाकूर म्हणाले, महामाता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेहकर यांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून आचरणात आणले आहेत. अशा महापुरुषांचे कार्य पुढील पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे. संगीता माळवदकर, रवींद्र माळवदकर, राजेंद्र वागसकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात पुरस्काराविषयी ॲड. प्रमोद आडकर यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभर लता राजगुरू यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश