गांधर्व महाविद्यालयात वाद्य वादनातून लता-आशा यांना ‘स्वरांजली’परांजपे बंधूंना पं. विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव पुरस्कार
गांधर्व महाविद्यालयात वाद्य वादनातून लता-आशा यांना ‘स्वरांजली’
परांजपे बंधूंना पं. विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव पुरस्कार
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेचा ९४वा वर्धापनदिन आणि आद्यगांधर्व महाविद्यालयाचा १२५व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्मविभूषण आशा भोसले यांना ‘स्वरांजली’ या कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली.
भारतीय आणि विदेशी वाद्यांच्या मांदियाळीतून साकारलेल्या स्वरानुभूतींचा अनुभव रसिकांनी या निमित्ताने घेतला. विविध वाद्यांचे आणि वाद्यवादकांचे स्वर-संमेलनच जणु विष्णु विनायक स्वरमंदिरात रंगले. गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्य वादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इन्कम टॅक्सच्या अतिरिक्त आयुक्त मुग्धा सरदेशपांडे, रामकृष्ण मठाचे अधिपती स्वामी श्रीकांतानंद, चितळे बंधुंचे संजय चितळे तसेच नगरकर सराफ पेढीचे वसंत नगरकर, गांधर्व महाविद्यालाचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे यांची उपस्थिती होती.
डॉ. प्रमोद गायकवाड (शहनाई), संजय भावे(सॅक्सोफोन), संजय गोगटे (ऑर्गन), सौरभ वर्तक (बासरी), सचिन जांभेकर (संवादिनी), पंडित प्रमोद मराठे (संवादिनी), अनिल गोडे (एकॉर्डियन), शंतनू गोखले (संतूर), अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन), साक्षी शेवलीकर (मोहनवीणा), अनिल पेंडसे (मेंडोलिन), मिलिंद तुळणकर (जलतरंग), स्वप्ना दातार (व्हायोलिन), शामकांत सुतार (माउथ ऑर्गन), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), विजय तुळसकर (सिंथेसायझर/संवादिनी), अमर ओक (बासरी), कल्याणी देशपांडे (सतार), दिप्ती कुलकर्णी (पियानिका), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), शामकांत परांजपे (विविध वाद्ये) आणि विवेक परांजपे (सिंथेसायझर) यांनी वाद्यवादनातून गीते सादर केली.
सचिन जांभेकर यांना या वेळी पंडित तुळशीदास बोरकर स्मृती संगतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर रमाकांत परांजपे, शामकांत परांजपे, आणि विवेक परांजपे यांना पं. विनाययकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. २१ हजार रुपये, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
रमाकांत परांजपे म्हणाले, पं. विनायकराव पटवर्धन स्मृती पुरस्कार मिळणे हे मी भाग्य समजतो. लतादीदी, आशाताईंसह सर्वच महान गायक, संगीतकारांबरोबर वादक म्हणून वावरण्याची संधी मिळाली. त्यांच्या सहवासातून खूप शिकता आले. जाहीर कार्यक्रम, दौरे आणि ध्वनिमुद्रणे, तालमी या कलाकारांनी मुक्त कंठाने वादनाला दिलेली दाद, याचे मोल मोठे आहे.
शामकांत परांजपे म्हणाले, विविध वाद्ये वाजवत असल्याने मला भारतीय आणि विदेशी नोटेशनवरील प्रभुत्वाचा फायदा मिळाला. संगीतकार खय्याम, ओ. पी. नय्यर, सी. रामचंद्र या महान संगीतकारांच्या अनेकानेक आठवणी आणि त्यांच्या सहवासामुळे शिकता आलेल्या असंख्य गोष्टी आहेत. कलेप्रती त्यांचे समर्पण विलक्षण होते, हे मी अनुभवले आहे. सी. रामचंद्र यांच्या गीतगोपाल व भुलाये न बने या कार्यक्रमांतून मी अनेक वर्षे वादन केले.
विवेक परांजपे यांनी लौकिक प्रशिक्षण नसूनही मी या क्षेत्रात आलो, शिकलो आणि स्थिरावलो, असे नमूद केले. घरचे संगीतमय वातावरण, बंधुंचे मार्गदर्शन आणि माझे परिश्रम यांना जन्मजात लाभलेल्या काही गोष्टींची जोड मिळाल्याने ४७ वर्षांची संगीत कारकीर्द घडली. गायक, संगीतकार आणि पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांसोबत हजारो स्टेज शो केले.
परांजपे बंधूंशी संगीतकार पराग माटेगावकर यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे
Comments
Post a Comment