कोरेगावपार्क परिसरातील महिला अत्याचार प्रकर णी गुलाबो गॅंग व बिटिया फाउंडेशन कडून पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.


आज आम्ही कोरेगावपार्क परिसरातील महिला अत्याचार प्रकर णी गुलाबो गॅंग व बिटिया फाउंडेशन कडून पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. 
पुणे शहरातील कोरेगाव पार्क – मुंढवा रोड परिसरात एका महिलेवर कार मध्ये लैंगिक अत्याचार झाल्या ची घटना समोर आली असून,या घटनेमुळे संपूर्ण शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या गंभीर प्रकरणा मध्ये सखोल तपास करावा आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी असे निवेदन आम्ही आज पोलिस स्टेशन ला गुलाबो गॅंग व बिटिया फाउंडेशनच्या वतीने कोरेगावपार्क पोलीस स्टेशन येथे जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजयकुमार डोके साहेब यांना निवेदन दिले. महिलांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळेस पोलिस गस्त वाढवावी,तसेच महिला पोलीस गस्त पण वाढवावी ही विनंती केली. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली. 
महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करणे खूप आवश्यक आहे ही मागणी केली. यावेळी गुलाबो गॅंग च्या संगीता तिवारी, शोभा पणीकर, सुवर्ण माने, भारती लोंढे या पदाधिकारी उपस्थित होत्या
गुलाबो गॅंग व बिटिया फाउंडेशन
संगीता तिवारी 
पुणे

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश