निसान ग्रॅव्हाइट सीएनजीकडून श्रेणीतील प्रथम ट्विन सिलेंडर रिट्रोफिटमेंट किट बाजारात, त्यामुळे खऱ्या अर्थाने ७ सीटर सीएनजी मोबिलिटी शक्य होणार
निसान ग्रॅव्हाइट सीएनजीकडून श्रेणीतील प्रथम ट्विन सिलेंडर रिट्रोफिटमेंट किट बाजारात, त्यामुळे खऱ्या अर्थाने ७ सीटर सीएनजी मोबिलिटी शक्य होणार
• सरकारी मान्यताप्राप्त सीएनजी रिट्रोफिटमेंट किट ऑल न्यू निसान ग्रॅव्हाइटसाठी प्रारंभीच्या ८२९९९ रूपयांत उपलब्ध.
• श्रेणीतील प्रथम ट्विन सिलेंडर सेटअपसोबत (२ X२५) आणि ७ सीटर रचना कायम ठेवणारी ही गाडी जागा, आराम आणि कार्यक्षमता कायम राखते.
• मोटोझेनकडून विकसन आणि दर्जाची हमी.
• किटच्या घटकांवर ३ वर्षे / १,००,००० किमी तृतीय पक्ष वॉरंटीसह
• १६ राज्यांमधील ६० शहरांमध्ये उपलब्ध
गुरूग्राम, ४ मे २०२६: निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एनएमआयपीएल) आज ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइटसाठी सरकार-मान्यताप्राप्त सीएनजी रेट्रोफिटमेंट किट सादर करण्याची घोषणा केली. यात श्रेणीतील प्रथम नाविन्यपूर्ण स्मार्ट ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान आहे, जे गाडीची संपूर्ण ७-सीटर रचना आणि उपयोगिता कायम ठेवते. ग्रॅव्हाइट सीएनजी १६ राज्यांमध्ये ८२,९९९/- रुपयांच्या प्रारंभीच्या किमतीत उपलब्ध असून ग्राहकांना अधिक स्मार्ट, अधिक वाजवी आणि पर्यावरण-सजग गतिशीलतेचा उपाय देण्यासाठी डिझाइन केली आहे. तसेच ती तिसऱ्या रांगेत पुरेशी जागा राखून आराम आणि दैनंदिन व्यावहारिकता देते.
एक व्यावहारिक पण भविष्यवेधी उपाय असलेली ग्रॅव्हाइट सीएनजी, “स्मार्ट पॉवर विथ स्मार्टर सेव्हिंग्ज” या दोन्ही गोष्टी एकत्र आणते. त्यामुळे गाडीचा आनंददायी रचना, आराम आणि दैनंदिन उपयोगिता कायम ठेवत प्रति किलोमीटर चालवण्याचा खर्च कमी होतो. हा सरकारी -मान्यताप्राप्त सीएनजी किट पूर्णपणे मोटोझेनद्वारे विकसित, उत्पादित असून त्यांनी त्याची गुणवत्ता हमी दिलेली आहे. ग्राहक निसानच्या अधिकृत डीलर्समार्फत सीएनजी किट बसवण्याची ऑर्डर देऊ शकतात. त्यामुळे सीएनजी उपाययोजना मिळवण्यासाठी हा एक अत्यंत सोयीस्कर आणि विश्वासार्ह खरेदी मार्ग ठरतो. तृतीय-पक्ष पुरवठादारामार्फत किटच्या घटकांवर ३ वर्षांची / १,००,००० किमीची वॉरंटीदेखील दिली जात आहे.
निसान आणि इन्फिनिटीचे मध्य पूर्व, केएसए, सीआयएस आणि भारत विभागीय उपाध्यक्ष आणि अध्यक्ष श्री. थिएरी सब्बाग म्हणाले, “भारत निसानसाठी एक मोक्याची बाजारपेठ आहे आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार समर्पक, सुलभ आणि भविष्यासाठी सज्ज असलेली उत्पादने व गतिशीलता उपाय आणण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइटसाठी सीएनजी पर्यायाचा समावेश हे त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ग्रॅव्हाइट सीएनजीद्वारे आम्ही प्रमुख सीएनजी बाजारपेठांमध्ये कुटुंबासाठी पुरेशी जागा, दैनंदिन गतिशीलता आणि कमी देखभाल खर्च यांचा मेळ शोधणाऱ्या ग्राहकांना एक सिद्ध, व्यावहारिक उपाय देत आहोत.”
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ वत्सा म्हणाले, “मॅग्नाइट सीएनजीला ग्राहकांकडून मिळालेल्या अत्यंत सकारात्मक प्रतिसादानंतर आम्हाला आता 'द ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइट'साठी या श्रेणीतील पहिली ट्विन-सिलेंडर उपाययोजना सादर करताना आनंद होत आहे. याची रचना अशा अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना दैनंदिन कौटुंबिक वापरासाठी ७-सीटर एमपीव्हीची व्यावहारिकता, लवचिकता आणि आराम हवा आहे. सरकारी मान्यताप्राप्त सीएनजी रेट्रोफिटमेंट किटद्वारे आम्ही हा प्रस्ताव आणखी मजबूत करत आहोत. हे एक असे सोल्यूशन आहे जे केवळ चालवण्यासाठी किफायतशीर नाही तर स्मार्ट ट्विन-सिलेंडर सेटअपद्वारे संपूर्ण ७-सीटर लवचिकता, रचना आणि क्षमता टिकवून ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्यामुळे जागा किंवा दैनंदिन वापराशी कोणतीही तडजोड होणार नाही.”
ही सीएनजी प्रणाली आरामाशी तडजोड न करता कार्यक्षमता, सुरक्षितता आणि परिणामकारकता देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तिच्या प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्यांमध्ये सिक्वेन्शियल बीएस६.२ अनुरूप सीएनजी किट, प्रमाणित सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसाठी आयकॅट-मान्यताप्राप्त प्रणाली, अधिक टिकाऊपणासाठी ८.१ मिमी जाडीचे हेवी-ड्यूटी सिलेंडर आणि विशेषतः ग्रॅव्हाइटसाठी अनुकूलित केलेले नवीन डायनॅमिक ॲडव्हान्सर तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. या प्रणालीत इंधन भरण्याची बंदिस्त जागा, सुयोग्य ब्रॅकेट्ससह सुबक फॅक्टरी-फिनिश इंटिग्रेशन, प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्यासाठी अनुकूलित मागील सीटची रचना आणि पेट्रोल व सीएनजीमध्ये तात्काळ रूपांतरित होणारे स्विचओव्हर अशी वैशिष्ट्येही आहेत.
ऑफिसला जाणे-येणे, मुलांना शाळेत सोडणे आणि शहराबाहेरील प्रवास अशा गोष्टी तसेच जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी, ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइट सीएनजी पेट्रोलच्या तुलनेत लक्षणीय बचत देते. त्यामुळे सीएनजीची जास्त मागणी असलेल्या बाजारपेठांमध्ये ७-सीटर गाडी चालवणे अधिक चांगले आणि परवडणारे ठरते. तसेच जास्त रहदारीच्या ठिकाणी आणि शहरी वातावरणात, स्वच्छ हवा आणि अधिक शाश्वत वाहतूक पर्यायांसाठी योगदान देते. यामुळे कुटुंबांना सोयीसुविधांशी तडजोड न करता अधिक जबाबदार निवड करता येते.
ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइट सीएनजी रेट्रोफिटमेंट किट आजपासून निसानच्या अधिकृत डीलर नेटवर्कद्वारे १६ राज्यांमध्ये उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या www.nissan.in
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडबाबत
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना २०१० मध्ये झाली असून ती जपानच्या निसान मोटर कंपनी लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. निसान मोटर कंपनी लिमिटेड ही ९० वर्षांहून अधिक काळाच्या नवसंशोधन आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेसह एक जागतिक ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. निसान आपल्या प्रतिष्ठित वाहनांसाठी, प्रगत मोबिलिटी तंत्रज्ञानासाठी आणि कामगिरीवर आधारित डीएनएसाठी ओळखली जाते. ही गोष्ट तिच्या जागतिक मोटरस्पोर्ट्समधील उपस्थिती आणि विद्युतीकरणातील नेतृत्वात दिसून येते. त्यात पुरस्कार-विजेत्या निसान लीफचा समावेश आहे.
निसान मोटर इंडिया ६५ आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरील देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठांना सेवा देते आणि सध्या जगभरात २,००,००० हून अधिक ग्राहकांसह निसान मॅग्नाइट आणि अगदी नवीन निसान ग्रॅव्हाइटची विक्री करते. कंपनीने २०२५ मध्ये १.२ दशलक्ष वाहनांची एकत्रित निर्यात साध्य केली. त्यामुळे ती भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल निर्यातदारांमध्ये गणली गेली. निसान मोटर इंडिया आपल्या विस्तारणाऱ्या नेटवर्क, भारतकेंद्री उत्पादने आणि नाविन्यपूर्ण, विश्वसनीय व ग्राहककेंद्री मोबिलिटीच्या वचनबद्धतेद्वारे आपली उपस्थिती अधिक मजबूत करत आहे.
Comments
Post a Comment