कामगारांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काँग्रेसच्या इंटक मध्ये सामील व्हा ॲड. सुभाष माछरे.पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम संपन्न



 कामगारांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काँग्रेसच्या इंटक मध्ये सामील व्हा ॲड. सुभाष माछरे.
पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम संपन्न

भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटक पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हा कमिटी पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्ती कार्यक्रम डेक्कन पुणे येथील हॉटेल रविराज मध्ये संपन्न झाले. यामध्ये मजदूर काँग्रेस इंटक पुणे शहराध्यक्ष इमरान शेख, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्ण माने, पुणे शहर महिला अध्यक्षा मुमताज शेख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आलिशा बुद्धिवंत, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रेखा माने, पुणे जिल्हा सचिव मेघा शेगर, प्रभाग क्रमांक 41 अध्यक्ष अविनाश कसबे, इत्यादींना पदनियुक्ती पत्र वाटप भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक चे प्रदेशाध्यक्ष ॲड सुभाष माछरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड.धनंजय बुद्धिवंत,भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे प्रदेश महासचिव शिवाजीराव म्हस्के, शिवाजीराव गायकवाड, सचिव प्रकाश घोळवे, सुवर्णा माने, आदी उपस्थित होते, यावेळी ॲड माछरे म्हणाले कामगारांच्या हक्कासाठी लढणारी काँग्रेस पक्षाची इंटकमध्ये कार्यकर्त्यांनी सामील व्हावे कामगारांना न्याय देण्याचे काम इंटक च्या माध्यमातून केले जाते कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका घेते व त्यांचे अडीअडचणी सोडवते राज्यभरात इंटक च्या माध्यमातून कामगार मजदूर व कार्यकर्ते यांनी आपल्या हक्कासाठी सन्मानासाठी इंटकमध्ये सामील व्हावे असे आव्हान ॲड सुभाष माछरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश