टाटा मोटर्सकडून ऑल-न्यू एस गोल्ड+ एक्सएल लाँच'इक्कीस साल बेमिसाल' मोहिमेच्या माध्यमातून २१ वर्षे प्रगतीला साजरे केले
टाटा मोटर्सकडून ऑल-न्यू एस गोल्ड+ एक्सएल लाँच
'इक्कीस साल बेमिसाल' मोहिमेच्या माध्यमातून २१ वर्षे प्रगतीला साजरे केले
मुंबई, ५ मे २०२६: प्रतिष्ठित टाटा एसच्या २१ वर्षपूर्तीला साजरे करत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज ऑल-न्यू टाटा एस गोल्ड+ एक्सएल लाँच केली, ज्यासह लास्ट-माईल मोबिलिटी क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अधिक वजन क्षमता (पेलोड) आणि लांब बॉडीच्या वापरासाठी विचारपूर्वक डिझाइन केलेला हा नवीन व्हेरिएंट लास्ट-माईल लॉजिस्टिक्सच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी एस पोर्टफोलिओचा विस्तार करतो. टाटा एस गोल्ड+ एक्सएल ब्रँडचा वारसा पुढे नेत आहे, ज्याने भारतातील छोट्या मालवाहतूक क्षेत्राला नवीन आकार दिला आणि आजही वाढत्या व वैविध्यपूर्ण उद्योजक वर्गाच्या आकांक्षांना पाठबळ देत आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून टाटा मोटर्सने 'इक्कीस साल बेमिसाल' मोहीम देखील सुरू केली आहे. ही देशव्यापी मोहीम उद्योजकांचा गौरव करते, ज्यांनी आपल्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी 'छोटा हत्ती'ला ठेवून आपली उपजीविका उभारली आहे. या मोहिमेमध्ये ग्राहक-केंद्रित उपक्रमांचा समावेश आहे, तसेच महिला उद्योजकांसाठी Rs. 21,000 रूपयांपर्यंतचे अतिरिक्त लाभ दिले जात आहेत. यातून सर्वसमावेशक विकासासाठी असलेली टाटा मोटर्सची दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
नवीन मॉडेल लाँच करताना टाटा मोटर्स लिमिटेडच्या एससीव्हीपीयू विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड श्री. पिनाकी हल्दर म्हणाले, "ऑल-न्यू एस गोल्ड+ एक्सएलच्या लाँचसह टाटा मोटर्स भारतातील सर्वात क्रांतिकारी व्यावसायिक वाहनाचा पुढील अध्याय सुरू करत आहे - अशी वेईकल, जी आधुनिक आंतर-शहरी आणि लास्ट-माईल लॉजिस्टिक्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत विकसित होत आहे. एसची उपयुक्तता आता अधिक वजन वाहून नेणाऱ्या कामांसाठी वाढवत एस गोल्ड+ एक्सएल हे आजच्या उद्योजकांना अधिक कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि मालकीचा अभिमान देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
2005 मध्ये लाँच झालेला टाटा एस भारतातील चारचाकी छोट्या व्यावसायिक वाहन श्रेणीमध्ये आघाडीवर आहे, तसेच या वेईकलने मोठ्या प्रमाणावर उद्योजकतेला सक्षम करून लास्ट-माईल लॉजिस्टिक्सची व्याख्या बदलली आहे. टाटा एसचे सातत्यपूर्ण महत्त्व उद्योगातील पहिल्या विक्रमातून दिसून येते: गेली 21 वर्षे दर 4.25 मिनिटाला एका एसची विक्री झाली आहे. या वेईकलने देशभरातील 26 लाखांहून अधिक मालकांचा विश्वास, आदर आणि निष्ठा संपादन केली आहे."
ऑल-न्यू टाटा एस गोल्ड+ एक्सएल: अधिक पेलोड. अधिक कमाई. अधिक मूल्य.
टाटा एस गोल्ड+ एक्सएल मालकाचा नफा वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ८-फूट लांब मालवाहू बॉडी आणि १ टन पेलोड क्षमतेसह ही वेईकल प्रत्येक ट्रिपमध्ये अधिक माल नेण्यास सक्षम आहे, म्हणजेच वाढीव वापर आणि कठीण डिलिव्हरी सायकलमध्येही अधिक कमाई करण्याची उत्तम क्षमता आहे.
प्रगत लिन नॉक्स ट्रॅप तंत्रज्ञानाची शक्ती असलेल्या एस गोल्ड+ एक्सएलमध्ये डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड (डीईएफ)ची आवश्यकता उरत नाही, ज्यामुळे वेईकल चालवण्यातील गुंतागुंती आणि देखभालीचा खर्च दोन्ही कमी होतात. याचा परिणाम म्हणजे मालकीचा एकूण खर्च कमी होतो, वेईकल रस्त्यावर अधिक वेळ कार्यरत राहते आणि मालकाला मानसिक शांतता मिळते. दररोज आपल्या वेईकलवर अवलंबून असणाऱ्या उद्योजकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. एस गोल्ड+ एक्सएलमध्ये ७०० सीसी टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे २२ पीएस पॉवर आणि ५५ एनएम टॉर्क प्रदान करते. हे इंजिन आव्हानात्मक लास्ट-माईल कामांमध्ये सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह कामगिरी बजावण्यासाठी डिझाइन केले आहे.
हे सर्व सुधारित बदल एकत्रितपणे एस गोल्ड+ एक्सएलला सध्याच्या एस मालकांसाठी आकर्षक अपग्रेड आणि भारताच्या वेगाने वाढणाऱ्या लास्ट-माईल परिसंस्थेमध्ये सामील होणाऱ्या नवीन उद्योजकांसाठी प्रबळ प्रवेशद्वार बनवतात.
प्रबळ एससीव्ही परिसंस्थेचे पाठबळ
टाटा एस गोल्ड+ एक्सएलला टाटा मोटर्सच्या सर्वसमावेशक स्मॉल कमर्शियल वेईकल परिसंस्थेचे दृढ पाठबळ लाभले आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एस प्रो, एस, इंट्रा आणि योद्धा यांचा समावेश आहे, जो ७५० किलो ते २ टनांपर्यंतच्या पेलोड गरजा पूर्ण करतो. ही वेईकल्स डिझेल, पेट्रोल, सीएनजी, बाय-फ्युएल आणि इलेक्ट्रिक अशा विविध पॉवरट्रेन्समध्ये उपलब्ध आहेत.
या वेईकलला टाटा मोटर्सचा एंड-टू-एंड लाइफसायकल सपोर्ट उपक्रम 'संपूर्ण सेवा २.०'चे पाठबळ आहे. तसेच, देशभरात पसरलेले २,५०० पेक्षा अधिक सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स आऊटलेट्सचे जाळे आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांची स्टार गुरु परिसंस्था यांचा देखील पाठिंबा आहे. यामुळे ग्राहकांना मालकीच्या प्रत्येक टप्प्यावर पूर्ण सहकार्याची खात्री मिळते.
ऑल-न्यू एस गोल्ड+ एक्सएलच्या माध्यमातून टाटा मोटर्स भारतातील उद्योजकीय विकासाला गती देण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. वारसा पुढे नेत आहे, ज्याने उपजीविका घडवली आहे, लॉजिस्टिक्स अधिक प्रबळ केले आहे आणि प्रत्येक प्रवासातून प्रगती साधली आहे.
Comments
Post a Comment