माजी आमदार दिप्तीताई चवधरी यांनी स्विकारला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम विभाग) च्या अध्यक्ष पदाचा पदभार.


                           

 

 माजी आमदार दिप्तीताई चवधरी यांनी स्विकारला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम विभाग) च्या अध्यक्ष पदाचा पदभार.

आज दि२१ मे २०२६ रोजी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम विभाग) च्या अध्यक्ष पदाचा पदभार माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या कडून दिप्तीताई चवधरी यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्विकारला 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. के. सी. वेणूगोपाल यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने माजी आमदार मा. दिप्तीताई चवधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

आज काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या पदभार स्विकारण्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘माझ्या सारख्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने पुण्यासारख्या शहराचे अध्यक्ष पद दिले ही माझ्या आयुष्‍यातील खुप मोठी गोष्ट आहे. अध्यक्ष असताना शहरातील निष्ठावान व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेवून व पदाधिकारी व नगरसेवकांना विचारात घेवून पक्षाचे काम गेली ४ वर्ष मी प्रामाणिकपणे केले काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढविली. यावेळी अनेक ज्ञात - अज्ञात कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सहकार्य केले त्यामुळे मी पक्षाची धुरा सांभाळू शकलो.’’

नवनिर्वाचित अध्यक्ष दिप्ती चवधरी यावेळी म्हणाल्या की, ‘‘काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना एक काँग्रेसची कार्यकर्ती ते पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष या प्रवासामध्ये अनेकांनी मला साथ दिलीपक्षाचे प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ आज अध्यक्ष पदाच्या रूपाने मला मिळाले. यामागे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माहर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्राचे प्रभारी, मा. रमेश चेन्नीथला, मासतेज उर्फ बंटी पाटील, निरिक्षक मा. विनोद सुलतानपुरी व पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाच्या हिताचे काम मी करेनत्याचबरोबर येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला उर्जा प्राप्त करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्ते व नेते यांच्या विचारांची काँग्रेस करण्याचा प्रयत्न करेन.’’

 यानंतर पुणे शहर काँग्रेस सेवादल अध्यक्ष लतेंद्र भिंगारे व पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांनी दिप्तीताईंचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगरसेवक रफिक शेख, सुनिल शिंदे, माजी नगरसेवक अजित दरेकर, मेहबुब नदाफ, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र भुतडा, बाळासाहेब अमराळे, प्राची दुधाने, राजाभाऊ कदम, सेवादल प्रमुख लतेंद्र भिंगारे, अजिज सय्यद, सोशल मिडीया अध्यक्ष गुलाम हुसेन खान, सुरेश नांगरे, फिरोज शेख, मुन्ना खंडेलवाल, ऋग्वेदिता सपकाळ, हर्षद हांडे, वैभव डांगमाळी, ॲड. ताम्हणकर विनोद चौरे, नितीन वायदंडे, कुशल चव्‍हाण, गणेश साळुंके, राजू बजेरी, राजेश जाधव, भारत पवार, राहुल वंजारी, बबन गोल्डे, स्नेहा रेणूसे, अन्वर पठाण, सुंदर ओव्‍हाळ, विकास कांबळे, अन्वर शेख, महेश पवार, विक्रम शहाणे, विजय सरोदे, सेल्वराज ॲन्थोनी, विल्सन मॅसी, भोला वांजळे, गणेश गुगळे आदी उपस्थित होते. 


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश