म्युच्युअल फंडचा नवीन उपक्रम; सर्व गुंतवणूकीच्या ट्रॅकिंगसाठी वेल्थ ३६० सुविधा सुरु वापरकर्ते या युनिफाइड डॅशबोर्डच्या मदतीने बँक ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स, ईटीएफ, एनपीएस आणि इतर सर्व प्रकारच्या गुंतवणूकी एकाच ठिकाणी पाहू शकतात.ही प्रणाली आरबीआयच्या नियमांनुसार

म्युच्युअल फंडचा नवीन उपक्रम; सर्व गुंतवणूकीच्या ट्रॅकिंगसाठी वेल्थ ३६० सुविधा सुरु वापरकर्ते या युनिफाइड डॅशबोर्डच्या मदतीने बँक ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स, ईटीएफ, एनपीएस आणि इतर सर्व प्रकारच्या गुंतवणूकी एकाच ठिकाणी पाहू शकतात.

ही प्रणाली आरबीआयच्या नियमांनुसार चालणा-या अकाउंट अग्रिगेटर व्यवस्थेवर आधारित आहे. ग्राहकांच्या परवानगीनंतरच संबंधित माहिती गुफपद्धतीने सुरक्षितरित्या उपलब्ध केली जाते.

ही सुविधा युटीआय म्युच्युअल फंडच्या एप्लिकेशन आणि संकेतस्थळावर पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. याद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टपोलिओबाबत तपशीलवार ताजी माहिती सादर केली जाते.

26भी मे, 2026, मुंर्ध - युटीआय म्युच्युअल फंड कंपनीने आज 'वेल्थ ३६०' या नवीन डिजीटल सुविधेची घोषणा केली आहे. हे आधुनिक फिचर युटीआय एमएफ एप्लिकेशन तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण संपत्तीची माहिती एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. विविध बँका आणि वित्तीय संस्थांमधील गुंतवणूकीचा मागोवा घेणे आता सोपे झाले आहे. हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित असून एकाच युनिफाइड डॅशबोर्डवर सर्व आर्थिक माहिती उपलब्ध करुन देते. या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांची आर्थिक गुंतवणूक व्यवस्थापित करणे सोयीचे ठरेल.

आजकाल गुंतवणूकदार वेगवेगळ्या आर्थिक योजना, प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. यामुळे संपत्तीचा आणि गुंतवणूकीचा मागोवा घेणे कठीण तसेच वेळखाऊ प्रक्रिया बनली आहे. गुंतवणूकदारांची हीच अडचण दूर करण्यासाठी 'वेल्थ ३६०' हे खास वैशिष्ट्यपूर्ण एप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. हे नवीन टूल विविध बँका, म्युच्युअल फंड, स्टॉक ब्रोकिंग खाती आणि इतर योजनांमधील सर्व गुंतवणूक एकाच माध्य‌मावर उपलब्ध करुन देते. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. युटीआय म्युच्युअल फंडच्या जुन्या आणि नवीन अशा दोन्ही ग्राहकांना याचा लाभ घेता येईल. यासाठी कोणत्याही वेगळ्या वेल्थ ट्रेकिंग एप्लिकेशनची गरज भासणार नाही. ग्राहक युटीआय म्युच्युअल फंडच्या अधिकृत एप्लिकेशन आणि संकेतस्थळावरुन थेट या सुविधेचा वापर करु शकतात.

ही नवीन सुविधा फिनार्कनच्या सहकार्याने आणि सहमतीच्या अकाउंट अग्रिगेटर इकोसिस्ट्रीमद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या आर्थिक गुंतवणूकीची माहिती एकाच माध्यमावर पाहू शकतात. यामध्ये बचत खाती, मुदत ठेवी, रिकरिंग डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड, शेअर्स ईटीएफ आणि एनपीएस गुंतवणूकीचा समावेश आहे. सध्या हे प्लॅटफॉर्म अकाऊंट अग्रिगेटर व्यवस्थेतील बँका, डिपॉझिटरीज, आरटीए, एनपीएस आणि विमान कंपन्यांना जोडण्यास मदत करते. यातून संपूर्ण संपत्ती एकाच माध्यमावर उपलब्ध होत, व्यवहारांचीही सखोल माहिती मिळते. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या खर्चाच्या पद्धती समजून घेणे, गुंतवणूकीवर लक्ष ठेवणे, एकून नेट वर्थचा मागोवा घेणे सोपे होते. वापरकर्त्यांना त्यांच्या पैशांची ताजी आणि अचूक माहिती मिळावी याकरिता हे डॅशबोर्ड दररोज अद्ययावत केले जाते.

हे नवीन पाऊल युटीआय म्युच्युअल फंडच्या डिजिटल तंत्रज्ञानावर असलेल्या विश्वासाला दर्शवते. कंपनी आपल्या ग्राहकांची सोय आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्याने डिजिटल फर्स्ट सुविधा निर्माण करत आहे. 'वेल्थ ३६०' च्या माध्यमातून युटीआय म्युच्युअल फंड आपली डिजिटल व्यवस्था मजबूत करत आहे. याद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या संपूर्ण आर्थिक प्रवासाची माहिती अत्यंत सुरक्षित, सोप्या आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध केली जाईल. यामुळे त्यांना आपले आर्थिक नियोजन करणे सोपे होईल. हे व्यासपीठ गुंतवणूकदारांना त्यांच्या सर्व प्रकराच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यासाठ हक्‌काचे माध्यम ठरले आहे.

'वेल्थ ३६०' हे नवीन वैशिष्ट्यपूर्ण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, कार्यसक्षम अकाऊंट अग्रिगेटर व्यवस्थेवर आधारित आहे. यामुळे मान्यताप्राप्त आर्थिक संस्थांमध्ये ग्राहकांची माहिती सुरक्षित राखली जाते. ग्राहकांची परवानगी असल्यास ही माहिती शेअर केली जाते. आपल्या वैयक्तिक माहितीवर ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण असणार आहे. ग्राहक आपल्या पसंतीक्रमातील बँक खाते किंवा गुंतवणूक या प्लॅटफॉर्मला जोडण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात. आर्थिक माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांनी दिलेली ही मंजुरी एका वर्षासाठी वैध राहते. तसेच ग्राहक ही मंजूरी कधीही रद्द करु शकतात. ही माहिती पूर्णपणे एनक्रिप्टेड म्हणजेच सुरक्षित कोडमध्ये असते. त्यामुळे ही गोपनीय माहिती फक्त ग्राहकालाच दिसते. युटीआय म्युच्युअल फंडलादेखील ग्राहकांच्या या गोपनीय माहितीमध्ये डोकावता येत नाही.



या सुविधेचा वापर करण्यासची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत आहे. ग्राहक त्यांच्या सध्याच्या लॉगइन आयडी आणि पासवर्डचा वापर करुन युटीआय म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतात. नवीन ग्राहक पॅन कार्ड आधारित नोंदणीद्वारे नवे खाते उघडू शकतात. एकदा लॉगइन केल्यानंतर ग्राहक आपली पात्र खाती सुरक्षितपणे जोडू शकतात. ही सर्व प्रक्रिया अकाऊंट अग्रिगेटर इकोसिस्ट्रीमद्वारे पूर्णपणे ग्राहकांच्या संमतीने पार पडते. यामध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. ग्राहकांच्या मंजूरीनंतरच खाती जोडली जातात.

या नवीन सुविधेच्या अनावरणाप्रसंगी युटीआय एएमसीचे ग्रुप प्रेसिडेंट आणि चीफ फायनान्शिअल ऑफिसर श्री. विनय लखोटिया म्हणाले," आजकालचे गुंतवणूकदार स्वतःला फक्त गुंतवणूक योजनेपूरते, एकाच बँक खात्मापुरते आणि एकाच वित्तीय संस्थेपुरते मर्यादित नसतात. आज वैविध्यपूर्ण संपत्तीचे मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळेच प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या संपूर्ण आर्थिक स्थितीचे चित्र एकाच ठिकाणी अगदी सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने पाहण्याची गरज भासत आहे. गुंतवणूकदारांची हीच गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही वेल्थ ३६०' ची निर्मिती केली आहे. वापरकर्त्यांना या एकाच विश्वासू प्लॅटफॉर्मवर गुंतवणूकीची एकत्रित आणि सविस्तर महिती उपलब्ध होईल."

"आजकालचे गुंतवणूकदार सुरक्षितता आणि गोपनीयतेशी तडजोड न करता चांगल्या सोयी-सुविधांच्या शोधात असतात. आम्ही युटीआय म्युच्युअल फंडमध्ये डिजीटल माध्यमांचा वापर हा केवळ पैशांच्या व्यवहारापुरता मर्यादित न राहता ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरावा याकरिता प्रयत्मशील असतो. आमच्या सेवा ग्राहकांसाठी सोप्या, सुटसुटीत आणि सक्षमनिहाय असाव्यात याकरिताच वेल्थ ३६०' उपलब्ध करुन दिले जात आहे. आम्ही या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणा-या सुरुवातीच्या कंपन्यांपैकी एक आहोत. ग्राहकांचा एकूण अनुभव अधिक समृद्ध करण्साठी आम्ही तंत्रज्ञान, साधेपणा आणि विश्वासाचा सुरेख मेळ घालण्यावर भर देतो, असेही त्यांनी विधान केले.

या कराराबद्दल फिनार्कनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल कु-हे यांनीही आपले मत मांडले. ते म्हणाले, "फिनार्कनमध्ये मालमत्ता व्यवस्थापन हे भविष्य पूर्णपणे वैयक्तिक गरजांवर आधारित असल्याकडे आम्ही भर देतो. युटीआय म्युच्युअल फंडसोबत आमची ही भागीदारी आणि वेल्थ ३६०ची सुरुवात हा भारतातील ओपन फायनान्स व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. अकाऊंट अग्रिगेटर प्रणालीच्या मदतीने आम्ही गुंतवणूकदारांनी याआधी कधीही न अनुभवलेल्या सुविधा देत आहोत. आता गुंतवणूकदार त्यांच्या सर्व आर्थिक मालमत्तांची माहिती कोणत्याही त्रासाशिवाय थेट एकाच ठिकाणी रिअल-टाइममध्ये पाहू शकतात. आता ओपन फायनान्स हा केवळ सरकारी नियमांचे पालन करण्याचा भाग राहिलेला नाही. ही प्रक्रिया व्यवसायात आघाडी घेण्यासाठी फायदेशीर ठरते. ग्राहकांच्या संमतीने अशा चांगल्या सुविधांमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युल फंडभविष्यात आपल्या गुंतणूकदारांशी आयुष्यभराचे विश्वासाचे


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश