तोशिबा ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन सिस्टम्स (इंडिया) ला उत्कृष्ट निर्यात कामगिरीसाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार
तोशिबा ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन सिस्टम्स (इंडिया) ला उत्कृष्ट निर्यात कामगिरीसाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार
हैदराबाद 13 मे 2026, : तोशिबा ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन सिस्टम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ला आर्थिक वर्ष 2024-25 साठी 57व्या इइपीसी इंडिया नॅशनल अवॉर्ड्समध्ये 'उत्कृष्ट निर्यात कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे. कंपनीने हा प्रतिष्ठित पुरस्कार सातव्यांदा मिळवला आहे. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीला चालना देण्यासाठी आणि जागतिक उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कंपनीने दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
गट 10: इलेक्ट्रिकल मशिनरी आणि पार्ट्स - लार्ज एंटरप्राइझ या श्रेणीमध्ये टीटीडीआयने हा सर्वोच्च बहुमान मिळवला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री सरदार मनजिंदर सिंह सिरसा यांच्या हस्ते टीटीडीआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. हिरोशी फुरुता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही मान्यता सरकारच्या मेक इन इंडिया व्हिजनशी सुसंगत असलेल्या, जागतिक उत्पादन व निर्यात केंद्र म्हणून भारताच्या वाढत्या भूमिकेला अनुसरून, भारतातून उच्च-गुणवत्तेची, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक वीज पारेषण आणि वितरण सोल्यूशन्स देण्यासाठीच्या टीटीडीआयच्या वचनबद्धतेवर भर देते.
कंपनीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना टीटीडीआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. हिरोशी फुरुता म्हणाले, “ईईपीसी इंडियाकडून पुन्हा एकदा हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त झाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा टप्पा मेक इन इंडिया उपक्रमाप्रती तोशिबाची अढळ वचनबद्धता आणि उच्च दर्जाच्या टी अँड डी उपकरणांसाठी भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्यातील आमचे यश दर्शवतो. तोशिबा ग्रुपच्या जागतिक पारेषण आणि वितरण व्यवसायाचे मुख्य केंद्र म्हणून टीटीडीआय भारतातून जगाला प्रगत आणि विश्वासार्ह वीज उपाय प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आमचे भारतात तयार झालेले ट्रान्सफॉर्मर्स आणि स्विचगिअर्स आता 50 पेक्षा जास्त देशांमधील पायाभूत सुविधांना ऊर्जा देत आहेत. नाविन्यपूर्ण संशोधन व अभियांत्रिकी उत्कृष्टतेद्वारे जागतिक हरित ऊर्जा संक्रमणास गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
हे यश उत्पादनातील टीटीडीआयचे सातत्यपूर्ण नैपुण्य आणि उच्च मूल्याच्या अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीवर शिक्कामोर्तब करते. ईईपीसी इंडिया नॅशनल अवॉर्ड्समध्ये कंपनीला सन्मानित करण्याची ही सातवी वेळ आहे. एकूण सात ‘स्टार परफॉर्मर नॅशनल अवॉर्ड्स’सह टीटीडीआय इलेक्ट्रिकल मशिनरी आणि अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रात भारताचे जागतिक स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
तेलंगणातील रुद्राराम येथील आपल्या अत्याधुनिक सुविधेतून कार्यरत असलेली टीटीडीआय पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर्स, गॅस इन्सुलेटेड स्विचगिअर्स (जीआयएस), प्रोटेक्शन अँड ऑटोमेशन सिस्टम्स आणि सर्ज अरेस्टर्सची सर्वसमावेशक श्रेणी तयार करते. कंपनी खुल्या प्रतिष्ठापनांसाठी आउटडोअर-टाइप जीआयएस सारखे मूल्यवर्धित उपाय देणे सुरू ठेवून नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि विश्वासार्ह वीज पायाभूत सुविधांकडे होणाऱ्या जागतिक बदलाला पाठबळ देत आहे.
-x-x-x-
Comments
Post a Comment