मुस्लिम बांधवांसाठी जगद्गुरू शंकराचार्यांचा विशेष संदेश; आशीर्वाद आणि कृतज्ञता व्यक्त

मुस्लिम बांधवांसाठी जगद्गुरू शंकराचार्यांचा विशेष संदेश; आशीर्वाद आणि कृतज्ञता व्यक्त
पुणे, दि. ___ :
परमपूज्य श्री जगद्गुरू शंकराचार्य उत्तराम्नाय ज्योतिर्मठ, बद्रीकाश्रम, बद्रीनाथ धाम, हिमालय येथील स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती जी महाराज श्री १००८ यांचा एक विशेष ध्वनी संदेश प्राप्त झाला आहे. हा संदेश विशेषतः मुस्लिम समाजातील बंधू-भगिनींसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे.हा संदेश पुण्यातील पुना गोल्फ क्लब चे कप्तान व मुस्लिम समाजातील जेष्ठ उद्योजक इक्रम खान यांच्या नावे त्यांनी दूरध्वनीद्वारे पाठवला आहे .

या संदेशातून जगद्गुरूंनी सर्व मुस्लिम बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत. समाजात परस्पर आदर, सौहार्द आणि बंधुभाव वाढावा, हा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
                     गाय ला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचे आवाहन पुना गोल्फ क्लब चे कप्तान इक्रम खान यांनी मुस्लिम समाजाला केले .तसेच शंकराचार्य यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि ईद च्या शुभेच्छांचे त्यांनी विशेष आभार मानून स्वागत केले आहे आणि या संदेशामुळे समाजात उत्साहाचे आणि बंधुभावाचे नाते निर्माण होणार असल्याचा विश्वास खान यांनी व्यक्त केला आहे .

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश