अभिनव मध्ये भव्य कला व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन

अभिनव मध्ये भव्य कला व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन 

आंबेगाव संकुलातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज च्या वतीने भव्य कला आणि हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पूर्व प्राथमिक च्यां चिमुकल्यासह प्राथमिक,माध्यमिक आणि सीबीएसई विभागाच्या जवळजवळ 1965:विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पोर्ट्रेट पेंटिंग, टू डी डिझाईन, कार्टून ड्रॉईंग, पेपर बटरफ्लाय मास्क मेकिंग, कार्ड होल्डर, कार्ड बोर्ड आर्ट,पेन होल्डर, , फ्रीहँड डिझाईन, राखीआर्ट , ग्रीटिंग कार्ड , थ्रेड आर्ट , पोर्ट्रेट, मधुबनी मंडला वारली मेमरी ड्रॉईंग, कॉफी पेंटिंग, पिक्सेल आर्ट, प्रिंट आर्ट, इत्यादी कलाप्रकार प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते . या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पुणे विद्यापीठाचे सिनेटचे सदस्य प्रसेनजित फडणवीस यांनी केले.तर प्रमुख उपस्थितांमध्ये , पुणे महानगर पालिकेचे शिक्षण समिती अध्यक्ष अरुण भाऊ राजवाडे. त्याचबरोबर या भागातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक हेही उपस्थित होते. या प्रदर्शनाचा मनमुराद आनंद सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घेतला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कला प्रकारचे तोंड भरून कौतुक केले.हे प्रदर्शन सुरेश उदमले सर त्यांच्या कल्पकतेमुळे आणि मेहनतीमुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता उजळून निघाली.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे प्रदर्शन केवळ सुंदरच नव्हे, तर प्रेरणादायी ठरले.त्यांचबरोबर कलाशिक्षक शैलेंद्र सोनाये, सुरज सुभेदार, सई दुर्गावळे, ज्योती क्षेमकल्याणी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सह सचिव निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, समन्वयक डॉक्टर सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कुमार बंगाळे यांनी केले तर आभार एडवोकेट दिलीप जगताप यांनी मांडले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश