"आर्ट इज माय लाईफ"या एकाच ध्येयाने प्रेरित झालेले माझे कलाप्रेमी मित्र श्री. दत्तात्रेय कुंडलिक वेताळ यांनी पेन्सिल स्केच स्वरूपात रेखाटलेली आशा भोसले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र मला पाठवले. ही त्यांची मूक आदरांजली ..आपणही पहा.

"आर्ट इज माय लाईफ"
या एकाच ध्येयाने प्रेरित झालेले माझे कलाप्रेमी मित्र श्री. दत्तात्रेय कुंडलिक वेताळ यांनी पेन्सिल स्केच स्वरूपात रेखाटलेली आशा भोसले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र मला पाठवले. ही त्यांची मूक आदरांजली ..
आपणही पहा.
 शब्द संपतात . .तिथे चित्रे अधिक बोलतात ,प्रेम व्यक्त करतात हेच खरं आहे.
1995 पासून नूमवि प्रशालेत दाखल झालेला हा एक गुणवंत विनम्र कला अध्यापक, सहकारी मित्र म्हणून मला भावला .
 31 वर्षाचा काळ लोटला आजही ते माझ्या सहवासात आहेत . ही विशेष कौतुकाची बाब 
चित्रकलेचे माजी शिक्षक स्वर्गीय राजे, केळूस्कर, केसकर ,पुरंदरे यांची परंपरा पुढे चालवणारा हा एकमेव कलासक्त माणूस मला प्रथम दर्शनी भावला, आपला वाटला.
फ्रीहँड ड्रॉईंग, व्यक्ती चित्र, पोट्रेट स्थिरचित्र, निसर्ग चित्र या कलाकृती वॉटर कलर, पेन्सिल स्केच ,रांगोळीद्वारे साकारण्यात त्यांचा हातखंडा आहे . कोणताही शालेय उपक्रम ,समारंभाचे रिच, रॉयल आणि डिग्नीफाइड करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो.
प्रसंग आहे 1995 माझ्या सेवानिवृत्तीनंतर सत्काराचा त्यावेळी मित्र प्रेमाची भेट म्हणून त्यांनी रेखाटलेले माझे पेन्सिल स्केच माझ्या संग्रही आजही आहे . प्रसंगानुरूप माझ्या घरी आलेल्या प्रत्येकाकडून हॉल मधील वेताळ सरांचे स्केच चे कौतुकच झालेले आहे . त्यात प्रामुख्याने पंडित हृदयनाथ मंगेशकर, पंडित उदयराज गोडबोले, चित्तरंजन कोल्हटकर, माधव वझे , ॲड . बाबुराव कानडे, श्रीधर माडगूळकर, सुधीर मोघे ,शिवाजी सावंत, रवींद्र पिंगे , वीणा देव ,प्रतिभा मोडक, सुलभा तेरणीकर, शैला मुकुंद ,विजय कोलते ,श्रीनिवास विनायक कुलकर्णी या दिग्गजाकडून मिळालेली दाद मला महत्त्वाची वाटते .
अशा गुणी चित्रकाराची जिल्हा आणि राज्यस्तरीय कला गौरव ,गोल्ड मेडल, आदर्श शिक्षक ,पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून छंद म्हणून दररोज एक तरी स्केच रेखाचित्र रेखाटण्याचा परिपाठ आजही चालू आहे .त्यांचे घर या रेखाटन आणि हजारो चित्रांनी भरलेले आहे .त्यात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय ,संशोधक संगीत ,कला ,नाट्य क्षेत्रातील मंडळींचे "चेहरे" या नावाने त्यांनी पुणे बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण कोथरूड कला दालन ,मुंबई सायन्स सेंटर ,कोल्हापूर कलादालन प्रदर्शनाला हजारो कला रसिकांची दाद मिळालेली आहे .
विख्यात राजकपूर स्टुडिओ चे 
कला दिग्दर्शक एम.आर. आचरेकर यांच्या रेखाटन पुस्तकाची आठवण व्हावी अशा तोडीचे वेताळ सरांचेअसे काम आहे .अलीकडच्या दोन दिवसात गायिका आशा जी यांचे निधन ,आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांची दोन रेखाटने मला आवर्जून पाठवली .ती पाहून मी चकित झालो .अशा थोर कलावंत मित्राची ही एक मूक आदरांजली वृत्तपत्राद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयास आहे . माझ्या मित्राचा हा कलाप्रवास आनंददायी प्रेरणादायी आहे .माझ्या शुभेच्छा


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश