लॉरिट्झ क्नुडसेनकडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार



 

 

लॉरिट्झ क्नुडसेनकडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार

ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत

१००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन.
लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन.
भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह कंपनीने भारताच्‍या ऊर्जा भविष्‍याला प्रबळ करण्‍याप्रती आपल्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ केले आहे. 'पॉवरिंग अ नॉन-स्टॉप इंडिया' या आपल्या ब्रँड वचनाला अनुसरून कंपनी विविध उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये स्थिर, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा परिसंस्था विकसित करत आहे.

भारताच्या प्रगतीसाठी ऊर्जेची स्थिरता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाचे असलेल्‍या काळात लॉरिट्झ क्नुडसेन लो-व्होल्टेज प्रोटेक्शनपासून ते इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि कनेक्टेड लिव्हिंग तंत्रज्ञानापर्यंत सर्वच क्षेत्रांत प्रगत सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहे. ही सर्व सोल्यूशन्स कामकाज विनासायास, सुरक्षित आणि शाश्वत ठेवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.

ही कटिबद्धता सिद्ध करत, कंपनीने नुकतेच मुंबईत ग्राहक, भागीदार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांना एकत्र आणून आपल्या विस्तारित पोर्टफोलिओचे प्रदर्शन केले. याद्वारे भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान भारताच्या उदयोन्मुख औद्योगिक केंद्रांच्या अधिक जवळ नेणे आणि उद्योगांना अधिक स्मार्ट व ऊर्जा-क्षम बनवण्यासाठी सक्षम करणे, हा यामागचा उद्देश होता.

ग्रेटर इंडियाचे झोन प्रेसिडेंट दीपक शर्मा म्हणाले, "भारताच्या विकासाची गाथा स्थिर, बुद्धिमान आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेवर आधारलेली आहे. लॉरिट्झ क्नुडसेन या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही अशी सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहोत, जी जागतिक मानकांनुसार असण्‍यासह भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांशी खोलवर जोडलेली आहेत. आम्ही भारतासोबत मोठे झालो आहोत, भारताकडून शिकलो आहोत, उत्पादनेही भारतातच तयार केली आहेत. आता आम्ही अशा विश्वसनीय, कार्यक्षम आणि शाश्वत ऊर्जा यंत्रणा सुनिश्चित करत आहोत, ज्या देशाच्या विकासाच्या पुढच्या टप्प्याला बळ देतील आणि या माध्यमातून आम्ही नव्या भारताची उभारणी करत आहोत."

लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनचे सीओओ नरेश कुमार म्हणाले, "लॉरिट्झ क्नुडसेनमध्ये आमचा दृष्टिकोन 'भारतासाठी डिझाइन आणि निर्मिती' यावर ठामपणे आधारलेला आहे. आम्ही अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहोत, जे भारतातील वातावरणातील वास्तवाशी जुळणारे आहे, मग ते शेतकऱ्याला दूरवरून सिंचन व्यवस्थापित करण्यास सक्षम करणे असो किंवा एमएसएमई आणि मोठ्या उद्योगांना ऊर्जेचा वापर ऑप्टिमाइझ करण्यात मदत करणे असो. आमचे वेगळेपण हे मेड-इन-इंडिया नाविन्‍यतांचे रूपांतर मोठ्या प्रमाणावरील वास्तव परिणामांमध्ये करण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये आहे. आम्ही उत्पादने बाजारपेठेत आणण्‍यासह ऊर्जा सुलभता वाढवून आणि कार्यक्षमता वाढवून भारताच्या औद्योगिक व ऊर्जा परिवर्तनाला मोठ्या प्रमाणावर सक्षम करत आहोत."

या इव्‍हेण्‍टमध्‍ये लॉरिट्झ क्नुडसेनने भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी एका विस्तारित राष्ट्रीय धोरणाची रूपरेषा मांडली. या वर्षाच्या सुरुवातीला, ब्रँडने १०० हून अधिक शहरांमध्ये 'टेक्नॉलॉजी डे' उपक्रम राबवण्यास सुरुवात केली, ज्याचा उद्देश उदयोन्मुख औद्योगिक क्लस्टर्समध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा आहे. या प्रयत्‍नातून लॉरिट्झ क्नुडसेन अत्याधुनिक लो-व्होल्टेज, ऑटोमेशन, पॉवर क्वालिटी आणि सोलर सोल्यूशन्स प्रत्‍यक्ष भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या केंद्रस्थानी आणत आहे. यामुळे फक्त महानगरांपुरते मर्यादित न राहता भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान सर्वत्र उपलब्ध करून देण्याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.

टेक्नॉलॉजी शोकेसची प्रमुख ठळक वैशिष्ट्ये:

हे प्रदर्शन तंत्रज्ञानाच्या चार मुख्य स्तंभांमधील (pillars) नवनवीन संशोधनांवर आधारित आहे:

१. प्रोटेक्‍शन आणि स्विचगियर

लॉरिट्झ क्नुडसेन त्यांच्या ७० वर्षांहून अधिक काळाचा अभियांत्रिकी वारसा आणि संशोधन व विकास (आरअँडडी) क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रतिबिंब असलेल्या लो-व्होल्टेज आणि मिडियम-व्होल्टेज संरक्षण, तसेच स्विचगियर सोल्यूशन्सचा अत्याधुनिक पोर्टफोलिओ प्रदर्शित करत आहे.

ओमेगा युझेड एसीबी: हे नेक्‍स्‍ट-जनेरशन एअर सर्किट ब्रेकर आहे, ज्याची रचना अशा वातावरणासाठी केली गेली आहे, जिथे बिघाड होणे परवडणारे नाही. युझेड सिस्टम पारंपारिक संरक्षणाला पॉवर नेटवर्कमधील एका बुद्धिमान आणि कनेक्‍टेड पार्टनरमध्ये रूपांतरित

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश