दगडूशेठ' च्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांची १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम कामगिरी*श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवले यश
*'दगडूशेठ' च्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांची १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम कामगिरी*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवले यश
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे सुरु असलेल्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी - १२ वी च्या परीक्षेत उत्तम कामगिरी केली. योजनेतील ११ विद्यार्थ्यांनी दहावी आणि २३ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. ट्रस्टने शैक्षणिक साहित्यासह इतरही गोष्टींच्या माध्यमातून दिलेल्या मदतीमुळे आणि गणरायाच्या आशिर्वादामुळे हे शक्य झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. योजनेतील अनेक विद्यार्थ्यांची आई ही घरकाम करते, कोणाचे वडील पेंटिंग करतात, कोण कारखान्यात काम करतात तर कोण बिगारी काम करतात. अशा घरच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे.
मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणारी समीक्षा भोसले ही विद्यार्थीनी ९४.४० टक्के गुण मिळवित योजनेंतर्गत प्रथम आली आहे. समीक्षा भोसले हिला मर्चंट नेव्ही मध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. समीक्षा चे वडील हयात नाहीत तर आई स्वयंपाकाची काम करते. तरी देखील प्रतिकूल परिस्थितीत तिने यश मिळविले आहे. मॉडर्न हायस्कूलमधील आदित्य दहिवलीकर हा ८६.६० टक्के गुण मिळवित द्वितीय आला असून त्याला भविष्यात पीएसआय व्हायचे आहे. तर, नूतन बालविकास मंदिर शाळेतील मृणाली सावंत हिने ८२.२० टक्के मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तिचे वडील बिगारी काम करतात. याशिवाय राधिका जाधव, ओंकार खळे, आदित्य मूर्टे, साईराज जाधव, अस्मय विधाते, किरण म्हेत्रे, हर्षदा गुजले, मंजुनाथ नवटक्के या विद्यार्थ्यांनी देखील उत्तम यश मिळविले आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेत मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्समधील श्रुतिका होडे हिने कॉमर्स विभागातून ८३.१७ टक्के गुण मिळवित योजनेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिला सीएमए होण्याची इच्छा असून त्याकरिता ती मेहनत घेत आहे. स.प.महाविद्यालयातील समृद्धी शिंदे हिने सायन्स विभागातून ८१.१७ टक्के गुण मिळवित योजनेत प्रथम क्रमांक पटकाविला. तिला डाटा अॅनेलिस्ट क्षेत्रात करिअर करायचे आहे. समृद्धी शिंदेचे वडील ड्रायव्हर असून घरची परिस्थिती बेताची आहे.
याशिवाय बारावीमध्ये आर्यन काशिद, प्रतिक्षा भालेराव, अथर्व शिंदे, शिवाजी ढेबे, रोहन चोरडिया, सिद्धेश अडसूळ, पवन पोहनकर, साई जाधव, प्राची आलाटे, रेहान जमादार, स्नेहा तुरे, गौरी कांबळे, प्रिया लादे, साईराज माळोदे, अथर्व भुवड, श्रुती जगताप, दिव्या निवळकर, पूर्वा उपळकर, शुभम मुंडे, विक्रांत कळबंडे, वैष्णवी राऊत यांनी यश संपादन केले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने व सर्व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment