२५ मे व्यापारी एकता दिवसानिमित्त ११ व्यापाऱ्यांचा गौरव”*

*२५ मे व्यापारी एकता दिवसानिमित्त ११ व्यापाऱ्यांचा गौरव”*

देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये व्यापारी वर्गाचा मोठा वाटा असतो. समाजाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यापासून रोजगारनिर्मितीपर्यंत व्यापारी वर्ग सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अनेक अडचणी, स्पर्धा आणि बदलत्या परिस्थितीचा सामना करत व्यापारी आपल्या मेहनतीच्या जोरावर व्यवसाय उभा करतात आणि समाजाच्या आर्थिक चक्राला गती देतात. अशा व्यापारी बांधवांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी २५ मे “व्यापारी एकता दिवस” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने व्यापार क्षेत्रात शून्यातून स्वतःचे विश्व उभे करणाऱ्या आणि प्रामाणिकपणा, जिद्द व ग्राहकांप्रती विश्वास जपत यश मिळवलेल्या ११ व्यापाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मातृ-पितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते शाल, मोत्याची माळ, पुष्पगुच्छ आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यामध्ये (श्री बालाजी फरसाण अँड स्वीटचे) राजकुमारजी परदेशी, (राधे कृष्ण ट्रेडिंग कंपनीचे) भरत चौधरी, (चिनी अँड सन्सचे) बर्शीजी चिनी, (भानुदास तुलसीदास टेस्टी) यांच्या उज्वला गांधी, (रवींद्र डिस्ट्रीब्युटर अगरबत्तीचे) रवींद्र संचेती, (नवनाथ अमृततुल्लाचे) काळूराम दौंडकर, (कृष्णा फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचे) कृष्णा ढाकणे, (मनाली फ्रुट क्लबचे) अमित आचार्य,( चांडक सन्सचे) राजेंद्र चांडक, (पंडित पान प्रतिष्ठानचे) राजेंद्रजी मिश्रा तसेच (सिंगल अँड कंपनीचे,) दयाराम अगरवाल यांचा समावेश होता.

याप्रसंगी मा. नगरसेवक प्रवीण चोरबेले, अनिल भन्साळी, संजय चोरडिया, ऋषी बागुल, किशोर मेगावत, व्यंकटेश ढोले, ओमकार मारणे, अशोक आरे, शिवा आजूरे, शिवा केंगारे, राहुल मेहता,पांडुरंग चोपडे, ईश्वर वायाळ,अमित माशाळे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणारा आणि समाजामध्ये व्यापारी एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश