केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा*

*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा*

पुणे, दि. ___ :
कवी, चित्रकार, शिल्पकार, लेखक आणि दलित पँथर चळवळीतील ज्येष्ठ नेते तसेच माजी गृहनिर्माण मंत्री दयानंद मसके यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार व ग्रंथ प्रकाशन सोहळा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार ३१ मे रोजी पुण्यात आयोजीत करण्यात आला आहे .

हा कार्यक्रम रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता औंध येथील भीमसेन जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात दयानंद मसके लिखित ‘वडलांचे व गावगाड्याचे चरित्र’, ‘बाप माझा जगनाथ’, ‘कडव्यापेक्षा जनावरं स्वस्त’ आणि ‘ते दिवस आठवले काही’ या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

       कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले उपस्थित राहणार असून, आंबेडकरी शाहीर संभाजी भगत यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व लेखक ज. वि. पवार राहणार आहेत.

दयानंद मसके गौरव समिती व मसके कुटुंबीय यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास साहित्य, कला व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश