हिरो मोटोकॉर्पकडून नवीन सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० लाँचभारतातील सर्वात विश्वासू १२५सीसी मोटरसायकलला मिळाले नवीन आधुनिक रूप!
- Get link
- X
- Other Apps
हिरो मोटोकॉर्पकडून नवीन सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० लाँच
भारतातील सर्वात विश्वासू १२५सीसी मोटरसायकलला मिळाले नवीन आधुनिक रूप!
सर्वोच्च आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या मोटरसायकलला आता मोठे आधुनिक रूप मिळाले आहे. हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल व स्कूटर उत्पादक कंपनीने आज ऑल-न्यू सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० लाँच केली आहे, जी भारतातील सर्वात विश्वासू आणि अत्यंत लोकप्रिय मोटरसायकल आहे. कंपनीच्या आक्रमक उत्पादन पुनरुज्जीवन धोरणावर आधारित ही ऑल-न्यू सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण सुधारणा, इंधन कार्यक्षमतेतील मोठी झेप आणि आजच्या प्रगतीशील राइडर्ससाठी तयार केलेल्या आकर्षक, आधुनिक डिझाइनद्वारे दैनंदिन प्रवासाचा अनुभव अधिक उंचावण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
१९९४ पासून भारतातील लाखो राइडर्सना प्रवासाचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या स्प्लेंडरच्या विश्वासू वारशावर डिझाइन केलेली ही ऑल-न्यू सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० राइडर्ससाठी डिझाइन केली आहे, जे आधुनिक काळातील सुविधा आणि पुढच्या पिढीच्या उत्पादन तंत्रज्ञान वैशिष्ट्यांसह खात्रीशीर कामगिरी शोधत आहेत.
या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत हिरो मोटोकॉर्पच्या इंडिया बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर आशुतोष वर्मा म्हणाले, "हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडरने तीन दशकांहून अधिक काळ लाखो ग्राहकांना विश्वास, कामगिरी आणि दैनंदिन विश्वासार्हता देऊन प्रबळ वारसा निर्माण केला आहे. नवीन सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० हाच विश्वास आकर्षक व आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि सुधारित सुविधा वैशिष्ट्यांसह पुढे घेऊन जात आहे. आपली विश्वासू कामगिरी व विश्वासार्हता, दैनंदिन व्यवहार्यता आणि उत्कृष्ट राइडिंग अनुभवासह सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० या श्रेणीतील हिरो मोटोकॉर्पचे नेतृत्व अधिक दृढ करते आणि आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य देण्याच्या कटिबद्धतेला अधिक प्रबळ करते."
आधुनिक स्टाइलिंग आणि नवीन ओळख
नवीन दृश्यात्मक ओळखीचा अभिमान बाळगणारी ऑल-न्यू सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० क्लासिक रचनेला तीक्ष्ण आणि आधुनिक आकर्षकता प्रदान करते. वैविध्यपूर्ण रंगसंगतीसह जोडलेले गतिमान ड्युअल-टोन बॉडी ग्राफिक्स मोटरसायकलच्या डिझाइनमध्ये नवीन उत्साहाची भर करतात. हे नवीन मॉडेल सिग्नचेर एक्सटेक २.० बॅजिंग, विशिष्ट व प्रीमियम थ्रीडी प्रतीक, स्टायलिश शिवणकाम केलेले दुहेरी-पोत असलेले आसन आणि लक्षवेधक रिम टेप्ससह येते, जे रस्त्यावर प्रभावी आणि प्रीमियम उपस्थिती निर्माण करते.
सुधारित कार्यक्षमता आणि श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज
ऑल-न्यू सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० मध्ये प्रमाणित आणि अत्यंत कार्यक्षम १२४.७ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे ७५०० आरपीएमवर १०.७ बीएचपी शक्ती आणि ६००० आरपीएमवर १०.६ एनएमचा उच्च टॉर्क निर्माण करते. दैनंदिन आरामदायी प्रवासासाठी सुसंगत केलेली ही मोटरसायकल विविध राइडिंग परिस्थितींमध्ये सुलभ अॅक्सेलरेशन, खात्रीशीर राइडिंगचा अनुभव आणि प्रतिसाद देणारी कार्यक्षमता प्रदान करते.
एक्सटेक २.० चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे श्रेणीतील सर्वोत्तम ७२ किमी प्रतिलीटरचे मायलेज आहे, जे अॅडवान्स्ड प्रोग्राम्ड फ्युएल इंजेक्शन (एपीएफआय) आणि हिरो मोटोकॉर्पच्या विश्वासू आय३एस (आयडल स्टॉप-स्टार्ट सिस्टम)च्या एकत्रित कार्यक्षमतेमुळे शक्य झाले आहे. ही यंत्रणा राइडिंगचा अनुभव वाढवताना इंधनाचा वापर सानुकूल करते. याव्यतिरिक्त, इंटीग्रेटेड स्टार्टर जनरेटर (आयएसजी) इंजिन सुरू करताना येणारा आवाज जवळजवळ नाहीसा करतो, तसेच रहदारीमध्ये थांबल्यावर इंजिन बंद पडल्यास पुन्हा विनासायासपणे सुरू करण्याचा अनुभव देतो, ज्यामुळे ट्रॅफिकच्या परिस्थितीत अधिक आराम आणि सुविधा मिळते.
स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे सक्षम केलेली सुरक्षा
दैनंदिन सुरक्षितता आणि चालकाचा आत्मविश्वास उंचावत ऑल-न्यू सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० ने सुपर स्प्लेंडर सिरीजमध्ये या श्रेणीत पहिल्यांदाच हॅझार्ड लाईट्स सादर केले आहेत. हे महत्त्वपूर्ण सुरक्षा वैशिष्ट्य चारही इंडिकेटर एकाच वेळी सुरू करण्याची सुविधा देते, ज्यामुळे अनपेक्षित आपत्कालीन परिस्थिती आणि मोटरसायकल खराब होण्याच्या काळात जास्तीत-जास्त दृश्यमानता सुनिश्चित होते. विविध रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये खात्रीशीर ब्रेकिंग कामगिरी आणि अधिक नियंत्रणासाठी ही मोटरसायकल फ्रंट डिस्क ब्रेकने सुसज्ज आहे. राइडरच्या सोयीमध्ये भर घालण्यासाठी हँडलबारवर बसवलेले इंजिन किल स्विच दिलेले आहे, जे तणावमुक्त दैनंदिन वापरासाठी इंजिन त्वरित बंद करण्यास मदत करते.
स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि दैनंदिन सुविधा
ऑल-न्यू सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह असलेल्या फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरद्वारे राइडर्सना विनासायासपणे कनेक्टेड ठेवते. दैनंदिन प्रवासादरम्यान सुविधा वाढवण्यासाठी डिझाइन केलेले हे कन्सोल येणारे कॉल अलर्ट, एसएमएस नोटिफिकेशन्स, मिस कॉल अलर्ट, कॉलर आयडी आणि फोनच्या बॅटरीची स्थिती प्रदर्शित करते.
या मोटरसायकलमध्ये हिरो मोटोकॉर्पचे रिअल टाईम मायलेज इंडिकेटर (आरटीएमआय) आणि लो फ्युएल इंडिकेटर देखील आहे, जे राइडर्सना नेहमी माहिती मिळवण्यास आणि इंधनाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आजच्या कनेक्टेड राइडर्ससाठी व्यावहार्यता आणखी वाढवण्यासाठी २ अॅम्पियरचा युएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट जोडला गेला आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान संवाद आणि नेव्हिगेशनसाठी स्मार्टफोन नेहमी चार्ज राहील.
दैनंदिन प्रवासासाठी उत्तम आराम
लांबच्या प्रवासादरम्यान कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेली सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० रुंद, सरळ हँडलबार आणि आरामदायी राइडिंग पोझिशनसह उत्तम अर्गोनॉमिक्स प्रदान करते, ज्यामुळे शहरातील रस्ते आणि खुले महामार्ग या दोन्ही ठिकाणी राइडर्सचा थकवा लक्षणीयरित्या कमी होतो. या मोटरसायकलमध्ये लांब, आरामदायी आसन चालक आणि पाठीमागे बसणारी व्यक्ती या दोघांसाठी पुरेशी जागा आहे, तर प्रगत टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन अनपेक्षित रस्त्यांवर संतुलित आणि आरामदायी प्रवास प्रदान करते. याव्यतिरिक्त, एक रुंद मागील ग्रॅब रेल खडबडीत रस्त्यावरील प्रवासादरम्यान पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला अतिरिक्त आधारासाठी उत्कृष्ट स्थिरता प्रदान करते.
रंग आणि किंमत
ऑल-न्यू सुपर स्प्लेंडर एक्सटेक २.० पाच वैशिष्ट्यपूर्ण रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – ग्लॉसी ब्लॅक, कॅंडी ब्लेझिंग रेड, मॅट अॅक्सिस ग्रे, मॅट नेक्सस ब्लू आणि मॅट चेस्टनट ब्राऊन, जे मोटरसायकलच्या आकर्षक व नवीन ओळखीला साजेसे असे तयार करण्यात आले आहेत. हे नवीन व्हेरिएण्ट देशभरातील हिरो मोटोकॉर्पच्या डीलरशिप्सवर ८६,५०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment