एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धामुलांच्या गटात अलौकिक सिन्हा विजेतामुलींमध्ये सई पाटील हिला विजेतेपद

एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य 
फीडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा
मुलांच्या गटात अलौकिक सिन्हा विजेता
मुलींमध्ये सई पाटील हिला विजेतेपद 

पुणे दिनांक १७ मे २०२६
एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन १९ वर्षाखालील गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेतील मुलांच्या गटात पुण्याचा अलौकिक सिन्हा (७ गुण)विजेता ठरला तर मुलींमध्ये पुण्याचीच सई पाटील (७ गुण) हिने विजेतेपद मिळविले. 

गणेश सभागृह व अश्वमेध कार्यालय या ठिकाणी पुणे डिस्ट्रिक्ट सर्कल व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांचे तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या गटात विजेतेपद मिळविणारा अलौकिक सिन्हा हा हिंजवडी येथील ब्ल्यू रिज प्रशालेत दहाव्या इयत्तेत शिकत आहे. त्याचे हे पहिलेच विजेतेपद आहे. वीरेश शरणार्थी, अयान सोमानी (पुणे), मानस गायकवाड (सोलापूर) सर्व ६.५ गुण यांनी अनुक्रमे दोन ते चार क्रमांक पटकाविले. 

मुलींच्या गटात सई पाटील (पुणे) व ईश्वरी जगदाळे (सांगली) यांचे प्रत्येकी सात गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान देण्यात आले. सई पाटील ही पवार पब्लिक स्कूल मध्ये दहाव्या इयत्तेत शिकत आहे. तिचे हे पहिलेच राज्य अजिंक्यपद आहे. श्रद्धा बजाज (नागपूर) व भूमिका वाघले (संभाजीनगर) यांचे प्रत्येकी सहा गुण झाले प्रगत गुणांच्या आधारे त्यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळविला. 

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, लोकमान्य मल्टीपर्पज सहकारी बँकेचे नारायण पेठ शाखा अधिकारी श्रीकांत देशपांडे, स्पर्धेचे संचालक प्रकाश कुंटे, संयोजन सचिव राजेंद्र शिदोरे पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलचे व्हाईस चेअरमन अश्विन त्रिमल, कार्यकारिणी सदस्य शेखर जोरी, शार्दुल गांधी हे यावेळी उपस्थित होते.

दोन्ही गटात पहिले चार क्रमांक मिळवणारे खेळाडू राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत

गटवार पहिले दहा क्रमांक मिळविणारे खेळाडू - मुले- १. अलौकिक सिन्हा (७ गुण) २. वीरेश शरणार्थी, ३. अयान सोमानी (सर्व ६.५ गुण, पुणे), ४. मानस गायकवाड (सोलापूर) , ५. अथर्व सोनी (ठाणे), ६.रायन मर्चंट (मुंबई उपनगर), ७. अक्षय पाटील (पुणे) ८. विक्रमादित्य चव्हाण (सांगली), ९. आरुष बडजादे (पुणे), सर्व ६.५ गुण, १०. भुवन शितोळे (पुणे) ६ गुण. 

मुली-१. सई पाटील (पुणे), २. ईश्वरी जगदाळे (सांगली) प्रत्येकी सात. ३. श्रद्धा बजाज (नागपूर),४. भूमिका वाघले (संभाजीनगर),५. दृश्या नाईक (मुंबई उपनगर), ६.दिशा पाटील (कोल्हापूर), ७.श्रेया हिप्परगी (सांगली), ८. सान्वी गोरे (सोलापूर), ९.मयंका राणा (पालघर) प्रत्येकी सहा गुण. १०. आरना गुप्ता (पुणे) साडेपाच गुण

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश