नागरिकीकरणातून आदिवासी समाजाचे शोषण : डॉ. श्रीपाल सबनीसबहुरंग, पुणे आयोजित १९व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप

नागरिकीकरणातून आदिवासी समाजाचे शोषण : डॉ. श्रीपाल सबनीस

बहुरंग, पुणे आयोजित १९व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप

 

पुणे : संपूर्ण जगातील आद्य पुरुष म्हणजे आदिवासी जमात आहे. त्यांचे जग, जंगल, जमीन नागरिकीकरणाच्या प्रक्रियेतून आपण बळकाविली आहे आणि आदिवासी समाजाचे शोषण केले आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

 

बहुरंग, पुणेतर्फे १९व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात आदिवासी कला पुरस्काराने प्रवीण चिंतामण खोरटे (नाशिक), मारोती दिवाकर टेकाम (राजूरा, चंद्रपूर) यांना गौरविण्यात आले. त्या वेळी डॉ. श्रीपाल सबनीस अध्यपदावरून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बहुरंग पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी मंचावर होते. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सुधागड (मराठी) हा चित्रपट दाखविण्यात आला.

 

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, संविधानाच्या माध्यमातून आदिवासी जनतेकरिता लोककल्याणकारी योजनांद्वारे विकास करण्याचा प्रयत्न केला गेला. आदिवासी साहित्यिक विद्रोह आणि वेदनाच्या अंगाने लिहिती होत आहे. आदिवासींचा आवाज, सुख-दु:ख-संवेदना यांना बहुरंगच्या माध्यमातून महत्त्व दिले गेले आहे, हे कौतुकास्पद आहे. आजच्या काळात स्वार्थीपणा, चंगळवाद, भौतिकवाद यांनी कळस गाठला आहे. यातूनच संतसंस्कारांचा पराभव झाल्याचे जाणवते. अशा प्रसंगी आत्मपरिक्षणाची भूमिका घेऊन आदिवासी बंधूंच्या वेदना आणि दु:ख समजून घेऊन ते दूर सारल्यास बंधूवाद, माणूसवाद जपला जाईल.

 

अरुण खोरे म्हणाले, आदिवासींचे जीवन अतिशय कष्टप्रद, संघर्षमय असते. हे जनसामान्यांपर्यंत पोहोचणे, त्यांना सामाजिक न्याय मिळणे गरजेचे आहे. उपेक्षित, वंचित, नाडलेले, गाडलेले अशा आदिवासींचे प्रश्न समाजासमोर मांडणे सोपे नाही. संवेदनशीलता हरवत चाललेल्या आजच्या काळात राज्यकर्त्यांनी संवेदनशीलतेचा गोफ विणत राजकारण आणि समाजकारण करणे गरजेचे आहे. रुपेरी पडद्याच्या माध्यमातून आदिवासींचे दु:ख जनतेसमोर मांडण्यासाठी महोत्सव उपयुक्त आहे.

 

प्रास्ताविकत डॉ. कुंडलिक केदारी म्हणाले, राज्य सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित महोत्सवात आदिवासी विषयक लघुपट, चित्रपट, माहितीपटांना स्वतंत्र पुरस्कार जाहीर करावेत, ज्या योगे आदिवासींविषयी चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्माता व दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण देशमुख यांनी केले तर आभार धीरज केदारी यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश