अभिनव इंग्लिश मिडीयम ज्युनिअर कॉलेज चा १२ वी चा १०० टक्के निकाल उत्तुंग निकालाची परंपरा याहीवर्षी कायम

अभिनव इंग्लिश मिडीयम ज्युनिअर कॉलेज चा १२ वी चा १०० टक्के निकाल  

उत्तुंग निकालाची परंपरा याहीवर्षी कायम 


           महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जुनिअर कॉलेज चा सायन्स विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
               जुनिअर कॉलेज च्या सायन्स विभागामध्ये अनुष्का पाठक ९२ टक्के गुण मिळवून प्रथम, ज्ञानेश थोरात याने ९१ टक्के गुण मिळवून द्वितीय तर स्वरा पेन्सलवार हिने ९०टक्के गुण मिळऊन तृतीय क्रमांक पटकावला तर जुनिअर कॉलेज च्या कॉमर्स विभागामध्ये ओम लेकावळे आणि सोहम बिवल कर याने संयुक्तपणे ८० टक्के गुण मिळवून प्रथम , कृष्णा गोगावले याने ७९.०० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर पायल रोडे हिने ७६ टक्के गुण मिळऊन तृतीय क्रमांक पटकावला.उत्तीर्णांमध्ये श्रावणी मांगडे हिने ८७.३० टक्के आणि निमिषा शर्मा ८१.१ टक्के गुण मिळून घवघवीत यश संपादन केले. 
              ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी दररोजच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शंकांचे वेळोवेळी निरसन केल्याने त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केल्यानेच आम्ही चांगले गुण मिळवू शकलो असे विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १२ वि च्या परीक्षेत उत्तुंग निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप , उपाध्यक्ष संजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप,सहसेक्रेटरी निर्मोही जगताप , खजिनदार ध्रुव जगताप,समन्वयक डॉ.सविता शिंदे,प्राचार्या वर्षा शर्मा,जुनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षिका सुनीता यादव कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी सर्व विद्यार्थी ,शिक्षक,आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

फोटो ओळ :१२ वीच्या परीक्षेत अभिनव जुनिअर कॉलेज चा १०० टक्के निकाल लागला आहे. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश