रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळा बुधवारीसंगीता माळवदकर, अरुण ठाकूर यांना रमाईरत्न पुरस्कार
रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी
संगीता माळवदकर, अरुण ठाकूर यांना रमाईरत्न पुरस्कार
पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या ९१व्या स्मृतिदिनानिमित्त महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे दिल्या जाणाऱ्या रमाईरत्न पुरस्काराने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या महिला विभाग प्रमुख संगीता रवींद्र माळवदकर आणि खडकी ॲम्युनिशन फॅक्टरीचे मुख्य महाप्रबंधक अरुण ठाकूर यांचा गौरव केला जाणार आहे. कार्यक्रम बुधवार, दि. २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर असणार आहेत. रमाई महोत्सवाचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, स्वागताध्यक्ष लता राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल कायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
Comments
Post a Comment