ऐतिहासिक “सुवर्णद्वीप” पुस्तकाचे ६ जून रोजी होणार प्रकाशन


ऐतिहासिक “सुवर्णद्वीप” पुस्तकाचे ६ जून रोजी होणार प्रकाशन

पुणे : प्राचीन भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध उलगडणाऱ्या “सुवर्णद्वीप - हिंदू बुद्धिस्ट किंगडम्स ऑफ एन्शंट इंडोनेशिया'' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन ६ जून रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती पुस्तकाच्या लेखिका ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की “सुवर्णद्वीप - हिंदू बुद्धिस्ट किंगडम्स ऑफ एन्शंट इंडोनेशिया'' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता फिरोदिया ऑडिटोरियम, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथे होणार आहे. यावेळी माजी आयसीएचआर अध्यक्ष डॉ. ए. पी. जामखेडकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जी. बी. देगलूरकर हे राहणार असून, डॉ. अंबरीश खरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

सागरी आग्नेय आशियातील प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रभाव, हिंदू-बौद्ध राज्यांची परंपरा, वास्तुकला, साहित्य, भाषा आणि सांस्कृतिक वारसा यांचा सखोल अभ्यास या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. व्यापार, समुद्री प्रवास आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीने इंडोनेशियासह अनेक देशांवर प्रभाव टाकला असून, त्या ऐतिहासिक नात्याचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचा जागतिक विस्तार आणि भारत-इंडोनेशिया यांच्यातील समृद्ध सांस्कृतिक संबंध नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या पुस्तकाचा उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. ‘अपरांत’ प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेले हे पुस्तक वाचकांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा नवा दृष्टिकोन देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश