पुण्याच्या प्रेक्षणीय ठिकाणांचा स्टेशनवरच कळणार ठावठिकाणा,डॉ.आढाव यांच्या स्मरणार्थ पथारी विक्रेत्यांचा उपक्रम*
*पुण्याच्या प्रेक्षणीय ठिकाणांचा स्टेशनवरच कळणार ठावठिकाणा,डॉ.आढाव यांच्या स्मरणार्थ पथारी विक्रेत्यांचा उपक्रम*
*पुणे दि. २९* - पाताळेश्वर गुंफा असो , महात्मा फुले वाडा असो, पु.ल.देशपांडे ओकायम गार्डन की शनिवार वाडा पुण्यात आल्यावर काय पाहायचे ? पुणे रेल्वे स्टेशनवर उतरल्या उतरल्या याचे उत्तर चित्रे नकाशा क्यु आर कोड सह प्रवाश्यांना मिळणार आहे. आपल्या दिवंगत नेत्याच्या डॉ. बाबा आढाव यांच्या स्मरणार्थ पुणे दर्शन-चित्र प्रदर्शन हा उपक्रम पुणे स्टेशन येथील पथारी विक्रेत्यांनी आयोजला आहे. त्याचे उदघाटन डॉ.आढाव यांच्या मृत्यू नंतरच्या पहिल्या जयंतीच्या पूर्वदिनी ,रविवार ३१ मे २०२६, स.११वा. बाबांच्या जीवनसाथी शिला आढाव यांच्या हस्ते होत आहे.
ससून,स्टेशन परिसरात पथारी,हातगाडीवर फळफळावळ, खाद्य पदार्थ, बॅगा ,कटलरी इ.वस्तू विकून रस्ता विक्रेते गुजराण करत असत. डॉ.आढाव यांच्या नेतृत्वाखालील लढा व पाठपुरावा करून जेएनएनयूआरएम योजने येथील भुयारी मार्गात छोट्या व्यावसायिकांसाठी मार्केट तयार करण्यात आले,त्यात या रस्ता विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात आले. मार्केटच्या स्वच्छता देखभालीसाठी या छोट्या विक्रेत्यांच्या सहभागानेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मोलेदिन हॉल पथारी व्यावसायिक पंचायत सहकारी संस्था स्थापन झाली आहे. हा अत्यंत वर्दळीचा परिसर ही संस्था नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करते. संस्थेने याआधीच येथे साइन बोर्ड,दिवे इ.ची व्यवस्था केली आहे. आत्तापर्यंत येणाऱ्या जाणाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे भुयारी मार्गाच्या भिंती खराब होत असत. आता या भिंती पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांची आधुनिक मटेरियल मध्ये तयार केलेली सुंदर चित्रे व त्याची संक्षिप्त माहिती देतील. तसेच तेथे कसे जायचं हे क्युअर कोड स्कॅन करताच सांगतील. अशी ९ भव्य पोस्टर येथे लावली जात आहेत. अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक नितीन पवार व अध्यक्ष इकबाल आळंद यांनी
Comments
Post a Comment