सॅमसंगकडून भारतात उत्कृष्ट व्ह्यूइंग अनुभवासाठी नेक्स्ट-जनरेशन व्हिजन एआय-समर्थित मिनी एलईडी टीव्ही लाँच• सॅमसंगची नवीन मिनी एलईडी लाइनअप प्रगत प्रोसेसिंग आणि आकर्षक डिझाइनसह अधिक सुस्‍पष्ट व्हिज्‍युअलस, आकर्षक रंगसंगती आणि सर्वोत्तम व्ह्यूइंग अनुभव देते. सॅमसंग नेक्स्ट जनरेशन व्हिजन एआय-मिनी एलईडी टीव्ही दाखल

सॅमसंगकडून भारतात उत्कृष्ट व्ह्यूइंग अनुभवासाठी नेक्स्ट-जनरेशन व्हिजन एआय-समर्थित मिनी एलईडी टीव्ही लाँच
• सॅमसंगची नवीन मिनी एलईडी लाइनअप प्रगत प्रोसेसिंग आणि आकर्षक डिझाइनसह अधिक सुस्‍पष्ट व्हिज्‍युअलस, आकर्षक रंगसंगती आणि सर्वोत्तम व्ह्यूइंग अनुभव देते. 

सॅमसंग नेक्स्ट जनरेशन व्हिजन एआय-मिनी एलईडी टीव्ही दाखल 
गुरुग्राम – मे 8, २०२६ - सॅमसंगने आज आपल्या नवीन मिनी एलईडी टीव्ही श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. ही श्रेणी अधिक सुस्‍पष्ट व्हिज्‍युअल्‍स आणि एआय सज्ज वैशिष्‍ट्यांसह सुसज्ज आहे. सॅमसंग मिनी एलईडी अत्याधुनिक तंत्रज्ञान अधिक व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.
अंदाजे ४२,९९० रुपयांपासून सुरू होणारे सॅमसंग मिनी एलईडी टीव्ही ४३-इंच ते १००-इंच अशा विविध स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध आहेत. मेटलस्ट्रीम डिझाइन अल्ट्रा-स्लिम बेझल्ससह एक स्लीक, सिंगल-मेटल बॉडी यात आहे. ज्यामुळे वापरकर्त्‍यांना एज-टू-एज व्ह्यूइंगचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव मिळतो. प्रगत तंत्रज्ञान, एआय वैशिष्‍ट्ये आणि प्रीमियम डिझाइनच्या संयोजनामुळे सॅमसंगचे मिनी एलईडी टीव्ही नेक्‍स्‍ट-जनरेशन मनोरंजन सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहेत.
 
“सॅमसंग सलग २० वर्षांपासून जागतिक स्तरावर नंबर १ टीव्ही ब्रँड राहिला आहे. आमच्या नवीन मिनी एलईडी टीव्हीद्वारे प्रीमियम होम एंटरटेनमेंट सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने आम्ही एक ठोस पाऊल उचलत आहोत. या लाँचमधून प्रगत डिस्प्ले तंत्रज्ञान अधिक सुलभ करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. तंत्रज्ञान आणि एआयचे संयोजन करत आम्ही एक तल्लीन करणारा आणि प्रगत व्ह्यूइंग अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही नवनवीन शोधांच्या कक्षा रुंदावत आहोत, तसे खात्री घेऊ की नेक्‍स्‍ट-जनेरशन तंत्रज्ञानाचे फायदे देशातील अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचतील,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे व्हाइस-प्रेसिडेंट विप्लेश डांग म्‍हणाले.
या लाँचच्या केंद्रस्थानी सॅमसंगचे प्रगत मिनी एलईडी तंत्रज्ञान आहे, जे सखोल कॉन्ट्रास्ट, सुधारित स्पष्टता आणि वास्तववादी दृश्यांसह उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी देते. मिनी एलईडी हे पारंपारिक एलईडीच्या तुलनेत अर्ध्या आकाराचे असतात आणि ते प्रकाशावर अचूक नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे बारकावे आणि वास्तववादी सखोलता स्पष्टपणे दिसून येते.
प्युअर स्पेक्ट्रम कलर वास्तववादी आणि अल्ट्रा-वाईड रंग निर्मितीसाठी पिक्सेल-पातळीवरील अचूकता सुनिश्चित करते, ज्यामुळे प्रत्येक रंगसंगती अधिक समृद्ध आणि स्पष्ट दिसते. प्रगत फॉस्फर तंत्रज्ञान रंगांची कार्यक्षमता अधिक वाढवते आणि अधिक वैविध्‍यपूर्ण व वास्तववादी दृश्यांसाठी ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाईड कलर गॅमट प्रदान करते. कलर बूस्टर आणि मिनी एलईडी एचडीआर सारख्या अतिरिक्त सुधारणा कॉन्ट्रास्ट आणि रंगांना अधिक उंचावतात, ज्यामुळे सर्व प्रकारच्या कंटेंटमध्ये सातत्याने उच्‍च दर्जाची दृश्ये मिळतात.
गेमर्स आणि क्रीडाप्रेमींसाठी, मोशन एक्सलरेटर १४४ हर्ट्झ वैशिष्ट्य कोणत्याही अडथळ्याशिवाय स्मूथ मोशनची खात्री देते, जे वेगवान कंटेंटसाठी योग्‍य आहे. हे तंत्रज्ञान फ्रेममधील हालचालींचा अंदाज घेते आणि त्या माहितीचा वापर करून पुढील फ्रेममध्ये हालचालींची सुलभता सुधारते.
ही नवीन श्रेणी सर्वात प्रगत मिनी एलईडी अनुभव देते, ज्यामध्ये सॅमसंगची उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी आणि एआय सज्ज वैशिष्‍ट्ये आहेत. यात वापरकर्त्‍याच्‍या पसंतीनुसार ऑडिओ कामगिरी सुधारण्यासाठी एआय साउंड कंट्रोलर देखील समाविष्ट आहे. हे मिनी एलईडी टीव्ही एनक्‍यू४ एआय जेन२ प्रोसेसरद्वारे चालवले जातात, ज्यामध्ये रिअल-टाइम पिक्चर आणि साउंड ऑप्टिमायझेशनसाठी २०-न्यूरल-नेटवर्क आर्किटेक्चर आहे. हे तंत्रज्ञान उत्कृष्ट अपस्केलिंग, प्रगत कॉन्ट्रास्ट कंट्रोल आणि विविध प्रकारच्या कंटेंटमध्ये सुधारित स्पष्टता प्रदान करते.
सॅमसंग नॉक्स सिक्युरिटी संवेदनशील डेटाचे रक्षण करते आणि कनेक्ट केलेल्या आयओटी डिवाईसेसवर लक्ष ठेवते, तर स्मार्टथिंग्स अधिक स्मार्ट जीवनशैलीसाठी घरातील डिवाईसेसना ऑप्टिमाइझ करते. वन यूआय टायझन कंटेंट जलदपणे उपलब्‍ध करून देते, तसेच एआय व्यवस्थापन आणि सात वर्षांच्या ओएस अपग्रेडसह विनासायास अनुभव देते.
घरगुती मनोरंजनाला नेले नव्‍या उंचीवर 
नवीन मिनी एलईडी लाइनअपमध्ये सॅमसंग टीव्ही प्लसची सुविधा मिळते, जी भारतातील आघाडीची'फ्री अॅड-सपोर्टेड स्ट्रीमिंग टेलिव्हिजन (एफएएसटी) सेवा आहे. ही सेवा बातम्या, चित्रपट, मनोरंजन आणि इन्फोटेनमेंट यांसारख्या श्रेणींमध्ये १४ भाषांमधील १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅनेल्‍स मोफत उपलब्‍ध करून देते. 
ग्राहक ५ टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक आणि ३० महिन्यांपर्यंतच्या लवचिक कालावधीसह झिरो डाउन-पेमेंट ईएमआयचा आनंद घेऊ शकतात. नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये आणि खास लाँच ऑफर्ससह सॅमसंगची नवीन मिनी एलईडी टीव्ही श्रेणी लिव्हिंग रूमचे रूपांतर एका सिनेमॅटिक हबमध्ये करण्यासाठी सज्ज आहे.
सॅमसंग मिनी एलईडी टीव्ही प्रमुख रिटेल आउटलेट्स आणि फ्लिपकार्ट, तसेच Samsung.com सह ऑनलाइन प्लॅटफॉर्म्‍सवर उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश