हृदयाचे आरोग्य आणि चांगल्या जीवनमानासह दीर्घायुष्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवणे अत्यावश्यक – तज्ञ
हृदयाचे आरोग्य आणि चांगल्या जीवनमानासह दीर्घायुष्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवणे अत्यावश्यक – तज्ञ
पुणे १५ मे २०२६: उच्च रक्तदाब तसेच त्यासोबत इतर सहव्याधी असलेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या गुंतागुंतीच्या धोका लक्षात घेता, हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व चांगल्या जीवनमानासह दीर्घायुष्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
दरवर्षी १७ मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या निमित्ताने अनेक जनजागृती उपक्रम हाती घेतले जातात . या वर्षीची संकल्पना आहे ' कंट्रोलिंग हायपरटेंशन टुगेदर, चेक युअर ब्लड प्रेशर रेग्युलर्ली, डिफिट द सायलंट किलर' ही आहे , जगभरात अकाली मृत्यू होण्याचे उच्च रक्तदाब हे एक प्रमुख टाळता येण्याजोगे कारण आहे. जागतिक स्तरावर, सुमारे १.४ अब्ज लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. प्रभावी आणि परवडणारे उपचार पर्याय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही, अनेक व्यक्तींना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती नसते आणि उच्च रक्तदाब असलेल्या चारपैकी केवळ एक व्यक्ती आपला रक्तदाब पुरेशा नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी होते. ( https://www.who.int/news-room/events/detail/2026/05/17/default-calendar/world-hypertension-day-2026)
पुण्यातील नोबल हॉस्पिटल येथील फिजिशियन, डॉ. दत्तात्रय पाटील म्हणाले की, नियमित तपासणी आता केवळ ४० वर्षांवरील लोकांसाठीच आवश्यक राहिलेली नाही. मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता वयाच्या १८ व्या वर्षापासून सार्वत्रिक तपासणी सुरू करण्याची शिफारस केली जाते. वाढता ताण आणि बैठी जीवनशैली यामुळे उच्च रक्तदाब लवकर दिसून येत आहे; वयाच्या विशीतच हे कल ओळखल्यास पुढे संभाव्य गुंतागुंत व औषधोपचार टाळता येऊ शकतात. वाढत्या संख्येमुळे रक्तदाब तपासणीच्या वयाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रक्तदाब नियंत्री ठेवणे महत्त्वाचे आहे.
डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले की, रक्तदाबाशी संबंधित अनेक चिंतांपैकी एक म्हणजे 'सेकंडरी हायपरटेन्शन'. मूत्रपिंडाचे आजार, अंतःस्रावी ग्रंथींचे विकार किंवा स्लीप ॲप्निया यांसारखे आजार असलेल्या लोकनामध्ये सेकंडरी हायपरटेन्शन दिसून येते . शहरी भागांमध्ये लठ्ठपणाचे वाढते प्रमाण तसेच सततचा गोंगाट आणि वायू प्रदूषण यांसारख्या इतर घटकांमुळे त्याची जोखीम वाढत आहे. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे एकाच वेळी अनेक सह-व्याधींची वाढती संख्या. विशेषतः, मधुमेह किंवा लठ्ठपणासोबत उच्च रक्तदाब अधिक धोकादायक असतो. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या कडक होतात, तर लठ्ठपणामुळे संपूर्ण शरीरात दाह निर्माण होतो आणि मूत्रपिंडावर दाब येतो. जर यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवले नाही, तर हे सर्व घटक मिळून हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांच्या पडद्याचे (रेटिना) नुकसान अधिक वेगाने वाढवतात.
डॉ . पाटील यांनी पुढे सांगितले की, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पाच-सूत्री दृष्टिकोन उपयुक्त ठरू शकतो, ज्यामध्ये अचूक सरासरी साठी आठवडाभर घरी रक्तदाब तपासणे, आहारात मिठाचे प्रमाण दररोज ५ ग्रॅम (१ चमचा) पेक्षा कमी पर्यंत मर्यादित ठेवणे , दररोज , ३० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम किंवा झेपेल ठेवड्या वेगाने चालणे, प्रक्रिया केलेल्या साखरेऐवजी फळे, भाज्या आणि कमी चरबी असलेले प्रथिनांना प्राधान्य देणे (डॅश आहार) आणि कॉर्टिसोल कमी करण्यासाठी व रक्तवाहिन्या शिथिल करण्यासाठी दीर्घ श्वास घेणे किंवा ध्यान-धारणा करणे यांचा समावेश आहे.
ते म्हणाले की, ज्यांना उच्च रक्तदाबासोबत इतर अनेक आजार आहेत, त्यांच्यासाठी विविध तज्ज्ञांकढून सल्ला दिलेल्या औषधांमधील एक दुसऱ्याच्या कार्यावर संभाव्य परिणाम टाळण्यासाठी समन्वित उपचार , वजन कमी करणे, (रक्तशर्करा आणि रक्तदाब एकत्र तपासण्यासाठी ॲप्सचा वापर करणे आणि औषधोपचारात सातत्य राखण्यासाठी ऑर्गनाईझर चा वापर करणे, हे उत्तम व्यवस्थापन आणि जीवनमान राखण्यासाठी उपयुक्त ठरेल.
Comments
Post a Comment